Video Game : आता व्हिडिओ गेम करणार मुलांचा मानसिक इलाज, कंपनीचा मोठा दावा; अमेरिका सरकारने दिली परवानगी

यापूर्वी केवळ 8 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी याचा वापर करता येत होता. मात्र आता 8 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील ही गेम खेळता येणार आहे.
Video Game to Treat ADHD
Video Game to Treat ADHDeSakal
Updated on

Video Game to Treat ADHD :

व्हिडिओ गेममुळे लहान मुलांच्या मनावर दुष्परिणाम होतो हे आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत. मात्र अमेरिकेतील एका गेमिंग कंपनीने असा दावा केला आहे, की त्यांची व्हिडिओ गेम (Video Game) खेळल्यामुळे लहान मुलांचा विशिष्ट मानसिक आजार बरा होऊ शकतो. अकिली नावाच्या कंपनीने आपल्या एंडेव्हर आरएक्स (EndeavorRx) गेमबाबत हा दावा केला आहे.

या कंपनीने म्हटलं आहे, की ज्या मुलांमध्ये ADHD आजाराची लक्षणे दिसून येतात, त्या मुलांनी ही गेम खेळल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. ADHD म्हणजे अटेंशन डेफिशिएट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर. यामध्ये एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे एखादी गोष्ट समजून घेणे, निर्णय घेणे अशा गोष्टी करता येत नाहीत. लहान मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. (Video Game for ADHD Treatment)

सरकारची परवानगी

विशेष म्हणजे, उपचारांसाठी या गेमची मदत घेण्यास अमेरिकेतील फूड अँड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) विभागाने ग्रीन सिग्नल दिला होता. यापूर्वी केवळ 8 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी याचा वापर करता येत होता. मात्र आता 8 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील ही गेम खेळता येणार आहे. अर्थात, यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. न्यूज18 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (FDA Approved Video Game)

Video Game to Treat ADHD
GTA 6 Hacker : 18 वर्षाच्या हॅकरने लावला टेक कंपन्यांना सुरूंग; आता आयुष्यभरासाठी रुग्णालयात होणार कैद

अशी करते काम

ही 25 मिनिटांची गेम आहे, जी एक महिन्यापर्यंत आठवड्यातून 5 वेळा खेळण्याचा सल्ला दिला जातो. या गेममुळे लहान मुलांच्या मेंदूचा व्यायाम होतो, त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि ADHD उपचारांसाठी मदत मिळते असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. प्रौढ व्यक्तींसाठी देखील या गेमचं एक वेगळं व्हर्जन उपलब्ध आहे, मात्र त्याला अद्याप सरकारची परवागनी मिळालेली नाही.

एफडीएने केलेल्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं होतं, की या गेमचा वापर करणाऱ्या 73 टक्के मुलांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. EndeavorRx या गेमचं आयओएस आणि अँड्रॉईड अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही पाच मिनिटांची ट्रायल घेऊ शकता. तसंच याच्या इनसाईट अ‍ॅपच्या मदतीने पालक आपल्या मुलांची प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात.

Video Game to Treat ADHD
Game Awards 2023 : यावर्षीच्या गेम अवॉर्ड्सची घोषणा, कोणती ठरली सर्वोत्कृष्ट गेम? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.