Fire Boltt Smartwatch: वेअरेबल ब्रँड फायर बोल्टने भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी नवीन फायर बोल्ट रिंग 2 स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. जर तुम्ही 5 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीन ब्लूटूथ कॉलिंग वॉच शोधत असाल, तर तुम्हाला हे घड्याळ खूप आवडू शकते. त्यामुळे तुम्हाला घड्याळाची किंमत, विक्रीची तारीख आणि आकर्षक फिचर्सची माहिती असायला हवी.
Fire-Boltt Ring 2 फिचर्स
डिस्प्लेबद्दल सांगायचे झाल्यास, घड्याळात 240 x 280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंच स्क्रीन आहे. क्लाउड बेस वॉच फेसमुळे तुम्ही वॉच फेसच्या विस्तृत श्रेणीमधून सहजपणे निवडू शकता. ब्लूटूथ कॉलिंग फीचर हे या घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स थेट घड्याळातूनच कॉल रिसिव्ह करू शकतील तसेच कॉल करू शकतील.या वॉचमध्ये तुम्हाला कॉल हिस्ट्री, क्विक डायल पॅड आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करणे असे फीचर्स मिळतील. हेल्थ फीचर्सही या घड्याळात उपलब्ध असून त्यात हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन आणि स्लीप मॉनिटर यासारखे फीचर्स आहेत. तसेच हे घड्याळ 30 स्पोर्ट्स मोड ऑफर करते. हे घड्याळ एकाच चार्जवर एक आठवडा टिकत असल्याने याची बॅटरीलाईफ चांगली आहे. याशिवाय, स्मार्ट नोटिफिकेशन्ससह, तुम्हाला व्हॉईस असिस्टंट सपोर्टही यात मिळतो.
अशी आहे किंमत
या नवीन फायर बोल्ट वॉचची किंमत 4,499 रुपये आहे. घड्याळाची विक्री 6 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. बाजारात, हे घड्याळ रेडमी वॉच 2 लाइट आणि अॅमेझफिट बिप यू प्रो सारख्या घड्याळांशी थेट स्पर्धा करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.