फ्लिपकार्टचा Sell Back प्रोग्राम; जुना स्मार्टफोन विका बेस्ट किंमतीत

flipkart launch sell back Programme you can sell used smartphones with best price
flipkart launch sell back Programme you can sell used smartphones with best price
Updated on

फ्लिपकार्ट (Flipkart) ने एक नवीन सेल बॅक प्रोग्राम सुरू केला आहे, ज्यामध्ये ई-कॉमर्स वेबसाइट ग्राहकांना त्यांचे जुने वापरलेले स्मार्टफोन विकता येणार आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर चांगल्या किमतीत विकू शकता. जुन्या फोनच्या बदल्यात कंपनी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर देणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी केले नाहीत ते फोनही येथे विकू शकता.

फ्लिपकार्टचा हा नवा प्रोग्राम सध्या स्मार्टफोन्ससाठी सुरू झाला आहे, परंतु आगामी काळात इतर कॅटेगरीच्या उत्पादनांचाही त्याअंतर्गत समावेश करण्यात येणार आहे. अलीकडेच फ्लिपकार्टने इलेक्ट्रॉनिक्स री-कॉमर्स फर्म Yaantra चे अधिग्रहण केले होते, त्यानंतर कंपनीने आता हा नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. याअंतर्गत भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये 1,500 हून अधिक पिनकोडसाठी लाईव्ह केला गेला आहे. IDC ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतीय 125 मिलीयन वापरलेल्या स्मार्टफोनपैकी फक्त 20 मिलीयन फोन पुन्हा दुसऱ्यांदा विकतात.

गॅझेट्स 360 ने दिलेल्या वृत्तानुसार एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे, फ्लिपकार्टने 14 फेब्रुवारीपासून सेल बॅक प्रोग्राम सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, हा प्रोग्राम फ्लिपकार्ट अॅपद्वारे ऍक्सेस केला जाऊ शकतो, जो तुम्हाला अॅपच्या तळाशी असलेल्या बारमध्ये एक नवीन ऑप्शन म्हणून दिसेल. गॅ. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने जाहीर केले आहे की नवीन बायबॅक प्रोग्राम सध्या फक्त स्मार्टफोन कव्हर करतो, परंतु भविष्यात इतर कॅटेगरीचा देखील समावेश करेल.

flipkart launch sell back Programme you can sell used smartphones with best price
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

Flipkart Sell Back प्रोग्राम सर्व स्मार्टफोन्सवर उपलब्ध असेल, मग तो फोन तुम्ही Flipkart वरून विकत घेतला असेल किंवा नसेल तरी. हा प्रोग्राम भारतातील 1,700 पिनकोडमध्ये लाईव्ह केला गेला आहे, ज्यामध्ये दिल्ली, कोलकाता, पाटणा या प्रमुख शहरांचा समावेश आहे. फ्लिपकार्टवर वापरलेल्या फोनची विक्री केल्यानंतर, वापरकर्त्यांना एक ई-व्हाउचर मिळेल, जे "right buy-back value"असणार आहे.

flipkart launch sell back Programme you can sell used smartphones with best price
गुगल ड्राइव्हचे 'हे' 5 भन्नाट फीचर्स, फार कमी लोकांना आहेत ठाऊक

स्मार्टफोन विकणाऱ्या युजरला तीन सोपे प्रश्न विचारले जातील, ज्याच्या उत्तरावर ग्राहकांना त्यांच्या फोनची नेमकी किंमत दाखवली जाईल. ग्राहकाने कंफर्म केल्यावर, Flipkart एक्झिक्युटिव्ह तुमच्याकडे 48 तासांच्या आत स्मार्टफोन घेण्यासाठी पोहोचेल. ई-कॉमर्स कंपनीने प्रॉडक्टची पडताळणी केल्यानंतर ग्राहकाला ई-व्हाउचर दिले जाईल.

flipkart launch sell back Programme you can sell used smartphones with best price
येतेय महिंद्राची इलेक्ट्रिक कार; आनंद महिंद्रांनी रिलीज केला टीझर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.