Samsung 5G Smartphone Discount : मोबाईल मार्केटच्या ऑनलाईन दुनियेत मोठा धमाका झाला आहे. सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन गॅलेक्सी S23 ची किंमत आता फ्लिपकार्टवर खूपच कमी झाली आहे. आता तुम्ही हा जबरदस्त फोन अगदी 40,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. त्याचबरोबर या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ मिळत आहे.
आधीच आकर्षक आणि प्रीमियम असलेला हा फोन आता आणखी स्वस्त झाल्यामुळे फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. iPhone 14 च्या जोडीने हा दमदार पर्याय ठरू शकेल. ग्लासचा बनविलेला मजबूत आणि स्टायलिश डिझाईन या फोनचे वैशिष्ट्य आहे.
गॅलेक्सी S23 5G ची लाँचिंग किंमत 89,999 रुपये होती. पण आता फ्लिपकार्टवर ही किंमत तब्बल 44 टक्के कमी झाल्याने फक्त 49,999 रुपये इतकी झाली आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळतो. तसेच एचएसबीसी बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास अतिरिक्त 1500 रुपये सूट मिळते.
याशिवाय फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात 40,000 रुपयेपर्यंत सूट मिळू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी S23 5G मध्ये 6.1 इंचाचा डायनामिक AMOLED डिस्प्ले आहे. यात HDR10+ सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची प्रोटेक्शन आहे. Android 14 वर चालणारा हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी यात 50MP + 10MP + 12MP चा जबरदस्त ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच 12MPचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम आहे. या फोनमध्ये 3900mAh ची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॅमसंगने नुकतीच घोषणा केली आहे की आता 'सर्कल टू सर्च' फीचर गूगलच्या सहकार्याने काही निवडक गॅलेक्सी A सीरीजच्या डिव्हाइसेस आणि गॅलेक्सी टॅब S9 FE सीरीजसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.