iPhone Offer: iPhone खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! ३३ हजार रुपये स्वस्तात मिळतेय लेटेस्ट मॉडेल

iPhone 14 ला ३३ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. फोन फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे.
iPhone 14
iPhone 14Sakal
Updated on

Bumper Discount on iPhone 14: आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone 14 वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या फोनला ३३ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. फोनवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

iPhone 14
Tata Cars: टाटाच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट, खूपच स्वस्तात घेऊन जा घरी; पाहा डिटेल्स

iPhone 14 वर मिळेल बंपर डिस्काउंट

iPhone 14 चे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत ८० हजार रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर ७३,९९० रुपये किंमतीत खरेदी करता येईल. याशिवाय, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

फोनवर २३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. सोबतच, ४ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळेल.

हेही वाचा: Upcoming Phone: कन्फर्म! या तारखेला येतोय Samsung चा सर्वात पॉवरफुल फोन, मिळेल 200MP कॅमेरा

एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास आयफोनच्या या मॉडेलला फक्त ४६,९९० रुपये किंमतीत खरेदी करता येईल. म्हणजेच, ८० हजारांच्या या फोनला तुम्ही ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Apple iPhone 14 मध्ये मिळेल शानदार फीचर्स

Apple iPhone 14 मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन A15 Bionic चिपसेटसह येतो. यात फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, ५जी कनेक्टिव्हिटीचा देखील सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()