Flipkart Minutes : 15 मिनिटात वस्तू तुमच्या हातात; झेप्टो, ब्लिंकिटशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टची 'Minutes' सेवा होतीये लाँच

Flipkart E-Commerce : जुलैमध्ये होऊ शकतो लाँच,मिळणार १००००हुन अधिक सुविधा,जाणून घ्या
Flipkart Minutes' Set for July Launch: Quick Commerce Venture to Rival Blinkit and Zepto
Flipkart Minutes' Set for July Launch: Quick Commerce Venture to Rival Blinkit and Zeptoesakal
Updated on

Flipkart : आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करणे,नव्या वस्तू आणि कपडे एक्सप्लोर करणे खूप आवडते. हीच ऑनलाईन शॉपिंग आता आणखी वेगवान होणार आहे. फ्लिपकार्ट लवकरच 'फ्लिपकार्ट मिनिट्स' (Flipkart Minutes) नावाची सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसद्वारे फक्त 15 मिनिटांमध्ये तुमच्या घरी तुमची ऑर्डर पोहोचवण्याची गॅरेंटी आहे.

फ्लिपकार्टची ही फास्ट ऑनलाईन शॉपिंगची तिसरी मोहीम आहे. त्यांच्या आधीच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. पण यावेळी फ्लिपकार्ट त्यांची मजबूत पुरवठा साखळी आणि मोठे विक्रेता नेटवर्क याचा वापर करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये फ्लिपकार्ट पुन्हा आपले स्थान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे.सध्या फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्म चांगले सुरु आहे आणि त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Flipkart Minutes' Set for July Launch: Quick Commerce Venture to Rival Blinkit and Zepto
Fridge Use Tips : पावसाळ्यात फ्रीज काही तासांसाठी बंद ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या एका क्लिकवर

फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, किराणा आणि इतर आवश्यक वस्तू 15 मिनिटांच्या आत घरी मागवू शकणार आहात. माध्यमांच्या अहवालानुसार ही सेवा जुलैच्या मध्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या फ्लिपकार्ट जयपूरमध्ये एक नवीन किराणा दुकान सुरू करत आहे जे दररोज 6,500 पेक्षा जास्त ऑर्डर्स पूर्ण करू शकते. याचा अर्थ फ्लिपकार्ट वेगवान आणि अधिक कार्यक्षम बनण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Flipkart Minutes' Set for July Launch: Quick Commerce Venture to Rival Blinkit and Zepto
Meditation Songs : सकाळी ऐका ही ५ गाणी; मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील,जाणून घ्या

Zomato ब्लिंकिट, झेप्टो आणि Swiggy Instamart यांसारख्या कंपन्या सध्या भारतातील फास्ट ऑनलाईन शॉपिंगमध्ये आघाडीवर आहेत. त्यामध्ये काही कंपन्या केवळ १० मिनिटात,८ मिनिटात सुविधा देखील देत आहेत. अश्यात फ्लिपकार्ट मिनिट्सच्या (Flipkart Minutes) आगमनाने या क्षेत्रात आता अधिक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ग्राहकांना मात्र याचा फायदा होणार आहे कारण त्यांना वेगवान आणि अधिक सुविधाजनक सेवा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.