FMWhatsApp नेमकं काय आहे? भारतात यावर बंदी का घातलीय, जाणून घ्या

fmwhatsapp what is fm WhatsApp and why it is banned in India check features and details
fmwhatsapp what is fm WhatsApp and why it is banned in India check features and details
Updated on

WhatsApp एक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ॲप आहे, यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स देण्यात येतात. यासोबतच यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सॲपकडून सातत्याने नवनवीन अपडेट्स जारी करण्यात येत आहेत. मात्र, बनावट व्हॉट्सॲप अपडेट्सच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचे काम काही लोकांकडून होत असते. असेच एक व्हॉट्सॲप क्लोन ॲप म्हणजे FMWhatsApp हे आहे.

यामध्ये खऱ्या व्हॉट्सॲपपेक्षा जास्त फीचर्स देण्यात आले आहेत. पण ते वापरणे धोकादायक आहे. मात्र, हे ॲप Google Play Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. परंतु FM WhatsApp हे थर्ड पार्टी ॲप्सद्वारे यूजर्सपर्यंत पोहोचवले जात आहे.

FMWhatsApp वेगळे कसे आहे?

  • FM WhatsApp एकाच वेळी एकाच डिव्हाइसवर दोन WhatsApp वापरण्याची परवानगी देते.

  • तुम्ही FM WhatsApp चा लुक कस्टमायज करू शकता. तसेच तुम्ही थीम बदलू शकता.

  • या ॲपमध्ये कोणालाही मेसेज पाठवण्यासाठी मोबाईल नंबर सेव्ह करण्याची गरज नाही.

  • या ॲपमध्ये, एका वेळी जास्तीत जास्त 500 लोकांना संदेश पाठवता येतो, जी संख्या सध्याच्या व्हॉट्सॲपमध्ये 250 आहे.

  • यामध्ये तुम्ही आपल्याला जास्त मोठ्या फायली पाठवता येतात. तसेच कोणी स्टेटस डिलीट केले असेल तर ते पाहण्याची सुविधाही मिळते.

fmwhatsapp what is fm WhatsApp and why it is banned in India check features and details
सॅमसंगचा परवडणारा स्मार्टफोन, मिळेल 1TB पर्यंत स्टोरेज अन् बरंच काही

ते वापरता येईल का?

FMWhatsapp ची कोणतीही अधिकृत व्हर्जन उपलब्ध नाही. या ॲपमुळे तुम्हाला सुरक्षेचा धोका असू शकतो. व्हॉट्सॲपच्या टर्म आणि कंडिशननुसार, जर कोणी सुधारित ॲप डाउनलोड केले तर त्याचे खरे व्हॉट्सॲप खाते बंद केले जाईल.

व्हायरसचा धोका आहे का?

बहुतेक मॉडिफाय केलेले WhatsApp अकाउंट मालवेअरसह येतात. जे वापरल्याने फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

एफएम व्हॉट्सअॅप कसे इंस्टॉल करावे

हे माहीत आहे की FMWhatsApp हे अधिकृत ॲप आहे, जे थर्ड पार्टी वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

fmwhatsapp what is fm WhatsApp and why it is banned in India check features and details
'तृतीयपंथीयांबाबत सरकारचा मोठा निर्णय; राजेश टोपेंनी दिल्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.