फोन चोरी झाल्यास बँक तपशील आणि वॉलेटच्या संरक्षणासाठी वापरा 'या' ट्रिक्स

चोरांना तुमच्या मोबाईल मधील बँक तपशील मिळवणे इतके अवघड नाही.
mobile theft
mobile theftsakal
Updated on

तुम्हाला माहीत आहे का? आजकाल चोर तुमचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर फक्त एकच गोष्ट शोधत असतात? ते म्हणजे तुमचे बँक तपशील. आपण हे विसरू नये की आजकाल जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट करत आहेत आणि विविध अॅप्स वापरत आहेत. चोरांना तुमच्या मोबाईल मधील बँक तपशील मिळवणे इतके अवघड नाही.

अशा चोरीच्या घटना सारख्या समोर येत असल्याने सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तुमचा फोन हरवल्यास, तुम्ही खालील पद्धतींनी तुमच्या फोनचा किंवा त्याच्या डेटाचा गैरवापर रोखू शकता.

mobile theft
UPI Payment : इंटरनेट नसेल तर ऑफलाइनही होईल पेमेंट; 'या' बँका देणार सुविधा

तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा

फोन हरवल्यास फोन नंबरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. सिम कार्ड ब्लॉक करणे म्हणजे फोनवरील प्रत्येक अॅप ब्लॉक करणे. ज्यामध्ये OTP द्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. तुम्ही नेहमी नवीन सिम कार्डवर जुना नंबर मिळवू शकता. या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. परंतु तुमची गोपनीयता आणि मोबाइल वॉलेट यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.

मोबाईल बँकिंग सेवा बंद करा

फोन चोर तुमच्या बँकेच्या तपशीलात सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे अशा वेळी बँक सेवा बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे सिम कार्ड आणि मोबाईल अॅप खूप महत्वाचे आहेत. कारण नोंदणीकृत नंबरवर OTP शिवाय कोणतेही ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण फोन हरवला किंवा चोरीला गेला की लगेच अॅप आणि सिम दोन्ही ब्लॉक केले पाहिजेत.

mobile theft
iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung चा मास्टरस्ट्रोक; येणार जबरदस्त फिचर्स असलेला फोन

UPI पेमेंट निष्क्रिय करा

थोडासा उशीर केला तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. एकदा तुम्ही फोन चोराला ऑनलाइन बँकिंग सेवांपासून वंचित ठेवल्यानंतर, चोर UPI पेमेंटसारख्या इतर सुविधांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शक्य तितक्या लवकर ते निष्क्रिय करा.

सर्व मोबाईल वॉलेट ब्लॉक करा

मोबाईल वॉलेटमुळे आयुष्य खूप सोपे झाले आहे. पण जर तुमचा फोन चुकीच्या हातात पडला तर गुगल पे आणि पेटीएम सारखे मोबाईल वॉलेट महाग ठरू शकतात. संबंधित अॅपच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधा आणि तुम्ही नवीन डिव्हाइसवर वॉलेट रीसेट करेपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची खात्री करा.

mobile theft
सिंगल चार्जमध्ये 241km धावणारी Zectron Electric Bike लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

पोलिसांकडे जा, तक्रार नोंदवा

एकदा तुम्ही वरील सर्व पायऱ्यांचे पालन केल्यावर, तुमच्या चोरी झालेल्या डिव्हाइसची माहिती अधिकार्‍यांना देणे देखील आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये फोन चोरीची तक्रार नोंदवू शकता आणि त्यांच्याकडून एफआयआरची (FIR) प्रत देखील घेऊ शकता. जर तुमच्या फोनचा गैरवापर झाला असेल किंवा तुमच्या फोनद्वारे तुमचे पैसे चोरीला गेले असतील तर ही प्रत तुमच्यासाठी पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.