Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु होऊन तीन दिवस झाले आहेत. रशियाने आक्रमक भुमिका घेत युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये सुंदर अशा युक्रेन देशाची अवस्था बिकट झाली आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मनी रशियावर बंधनं घालायला सुरुवात केली आहे. युट्यूबनेही (YouTube) रशियाच्या सरकारी मीडिया संस्थांच्या चॅनेलवर बंदी घातण्याचा निर्णय घेतला असून व्हिडिओच्या माध्यमातून होणारी कमाई थांबवली आहे. (Following Google, Twitter, now Russia is also banned on YouTube!)
गुगलने रशियाच्या सर्व प्रसारमाध्यमांची अकाउंट बंद (Bann) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या जाहिरात प्रसारण करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल पाठोपाठ आता युट्यूबनेही रशियाच्या सरकारी मीडिया संस्थांच्या चॅनेलवर बंदी घातण्याचा निर्णय घेतला असून व्हिडिओच्या माध्यमातून होणारी कमाई थांबवली आहे.
''रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केल्यामुळे फेसबुकने रशियाच्या सर्व जाहिराती, व्हिडिओचे प्रसारण बंद केले आहे,'असं सोशल नेटवर्क सुरक्षा धोरणाच्या प्रमुख नथानिएल ग्लीचर म्हणाल्या. आमच्या डिजिटल व्यासपीठावर रशियाला बंदी घातली आहे. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीवर आमची नजर आहे. युक्रेनच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत,''असं त्या म्हणाल्या.
ट्विटरनेही रशियावर निर्बंध घालत. रशिया आणि युक्रेनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहीराती थांबविण्यास सांगितले आहे. ''रशियातील काही व्यक्तींचे टि्वट अकाउंट बंद करण्यात येत आहेत. उत्तम व सुरक्षित सेवेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,'' असे टि्वटरने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.