Digital License Plate : आता गाड्यांवर दिसणार 'डिजिटल नंबरप्लेट'! फोर्ड ठरली जगातील पहिली कंपनी; किती आहे किंमत?

Ford Reviver : कॅलिफोर्नियातील एका कंपनीसोबत करार करुन, फोर्डने रीव्हाईव्हर या कंपनीला आपल्या सोबत घेतलं आहे.
Digital License Plate
Digital License PlateeSakal
Updated on

आजकाल चारचाकी गाड्यांमध्ये कित्येक हायटेक फीचर्स पहायला मिळतात. वेगवेगळ्या कार कंपन्यांमध्ये अधिकाधिक अ‍ॅडव्हान्स फीचर्स देण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. आता यात फोर्ड कंपनीने एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे.

आपल्या गाड्यांवर डिजिटल नंबरप्लेट किंवा रजिस्ट्रेशन प्लेट उपलब्ध करून देणारी फोर्ड ही जगातील पहिलीच कंपनी ठरली आहे. कॅलिफोर्नियातील एका कंपनीसोबत करार करुन, फोर्डने रीव्हाईव्हर या कंपनीला आपल्या सोबत घेतलं आहे. रीव्हाईव्हर कंपनीच या डिजिटल लायसन्स प्लेट तयार करते

कारस्कूप्स वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुविधा सध्या अमेरिकेतील ठराविक फोर्ड डीलर्सकडे उपलब्ध असेल. याला मुख्य कारण म्हणजे कित्येक ठिकाणी अद्याप डिजिटल लायसन्स प्लेटला परवानगी मिळालेली नाही.

Digital License Plate
Sunroof Car Drawbacks : Sunroof कारचे फायदे कमी अन् तोटेच जास्त, घेण्याआधी हजारवेळा विचार करा

कुठे आहे परवानगी?

डिजिटल लायसन्स प्लेट वापरण्याबाबत अमेरिकेत निर्बंध लागू आहेत. केवळ अरिझोना, कॅलिफोर्निया आणि मिशिगन या राज्यांमध्येच सामान्य नागरिकांना अशा नंबरप्लेट वापरता येतात. तर टेक्सासमध्ये केवळ कंपनीच्या गाड्या आणि सरकारी गाड्यांमध्ये याचा वापर करण्याची परवानगी आहे. कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये देखील अशा लायसन्स प्लेट वापरण्याची परवानगी आहे

काय आहेत फीचर्स?

डिजिटल नंबर प्लेटच्या माध्यमातून यूजर्स त्यावर कारच्या नंबर सोबतच पर्सनलाईज्ड मेसेज देखील टाकू शकणार आहेत. यावरील मजकूर बदलण्यासाठी मोबाईल अ‍ॅपची मदत घेता येणार आहे. सोबतच, गाडी चोरी होत असल्यास त्यावर रिअल-टाईम अलर्ट देखील दिसणार आहे.

Digital License Plate
Car Offer : एक रुपयाही न भरता मिळेल ही हॅचबॅक कार; दहा हजारांपेक्षा कमी बसेल हप्ता! जाणून घ्या डीटेल्स

दोन पद्धतीच्या प्लेट्स

रिव्हाईव्हर कंपनीने दोन प्रकारच्या लायसन्स प्लेट तयार केल्या आहेत. यातील पहिली RPlate ही बॅटरी पॉवर्ड असणार आहे. ज्याची बॅटरी सुमारे पाच वर्षं टिकेल. तर, दुसरी हार्डवायर्ड प्रकारची लायसन्स प्लेट असणार आहे. ही सध्या केवळ कमर्शिअल गाड्यांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

किती आहे किंमत?

Rplate ची किंमत ही 599 डॉलर्स (सुमारे 49,000 रुपये) एवढी असणार आहे. याचा वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन हा 75 डॉलर्स (सुमारे 6,000 रुपये) असणार आहे. तर हार्डवायर्ड लायसन्स प्लेटची किंमत 749 डॉलर्स (सुमारे 62,000 रुपये) असणार आहे. यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेस 150 डॉलर्स (सुमारे 12,000 रुपये) असतील. तर वार्षिक सबस्क्रिप्शन 95 डॉलर्स (सुमारे 7,000 रुपये) एवढं असेल.

Digital License Plate
Meta Connect 2023 : व्हीआर हेडसेट, रे-बॅन स्मार्ट ग्लासेस अन् बरंच काही.. मेटाचे हायटेक डिव्हाईसेस लाँच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.