वाहन विमा क्षेत्रातील फसवेगिरीपासून सावधान! खरेदी करताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

अगदी बनावट विमा कागदपत्रे (Insurance Documents) देणाऱ्यांच्या टोळ्यादेखील सक्रिय आहेत.
Auto Insurance Sector
Auto Insurance Sectoresakal
Updated on
Summary

आता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सावधगिरीमुळे विम्याची नोंद ऑनलाईन होत आहे.

सांगली : तुमच्या चारचाकी, दुचाकी वाहनाचा विमा उतरवत आहात. विविध कंपन्यांची माहिती समोर येते आहे.. दरात प्रचंड फरक आहे... काहीजण अगदीच कमी दरात विमा देत आहेत...गोंधळून जाऊ नका. सावधपणे सगळ्या गोष्टी तपासून घ्या. वाहन विमा क्षेत्रात फसवेगिरी वाढली आहे. अगदी बनावट विमा कागदपत्रे (Insurance Documents) देणाऱ्यांच्या टोळ्यादेखील सक्रिय आहेत. त्यामुळे बारकावे तपासून, जाणकारांच्या सल्ल्याने आणि विश्‍वासू व्यक्तीकडूनच विमा उतरवणे फायद्याचे ठरेल, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Auto Insurance Sector
E-Bike Battery : 'अशी' काळजी घेतली तरच ई-बाईक बॅटरी टिकेल, अन्यथा..; काय आहेत नेमके गैरसमज?

नवीन वाहनाचा कंपनीकडून एक वर्षाचा फुल्ल, तर तेथून पुढे चार वर्षांचा थर्ड पार्टी विमा उतरवला जातो. वाहनधारकांनी एक वर्षानंतर थर्ड पार्टी (Third Party) विम्याची रक्कम वजा जाता अधिकची रक्कम देऊन पूर्ण विमा उतरवून घ्यावा, असा प्रयत्न असतो. बहुतांश वाहनधारक तो पर्याय निवडतात. जुनी वाहने असलेल्या मालकांकडे मात्र विमा मुदत संपत आली, की एकामागून एक विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे फोन यायला लागतात.

विविध कंपन्यांच्या पॉलिसी (Policy) व त्यातील दराचा फरक लक्षात घेतल्यानंतर ग्राहकांचा गोंधळ वाढतो. पैसे वाचतात म्हणून वाहन मालक फसतात. अनेकांना तर फक्त विमा उतरवला आहे असा कागद मिळतो, मात्र प्रत्यक्षात विमा उतरवला जात नाही. आता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सावधगिरीमुळे विम्याची नोंद ऑनलाईन होत आहे. त्यामुळे तुम्ही विमा घेतल्यानंतर त्याची नोंद ऑनलाईन झाली आहे का, हे आधी तपासून घ्या.

Auto Insurance Sector
आता कैद्यांना मिळणार आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात देशातला पहिलाच उपक्रम

विमा देणारी कंपनी वाहनाचा अपघात झाल्यास किती परतावा देणार आहे? काच, बॉडी, इंजिन, पाण्याने खराब होणे, अपघातात नुकसान यासाठी वेगवेगळे निकष काय लावले आहेत? अपघातात चालकाचा किंवा चालकच मालक असल्यास त्याचा, सोबतच्या प्रवाशांचा मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास किती भरपाई मिळणार, याची पूर्ण माहिती घ्या. या माहितीची तुलना महत्त्वाची. केवळ विमा रक्कम पाहाल तर फसाल, हे नक्की.

केवळ आरटीओ अडवतात, दंड करतात म्हणून वाहनाचा विमा घेऊ नका. तुमच्या वाहनाचे, तुमचे आणि सोबतच रस्त्यावर धावणाऱ्या हजारो वाहनांच्या आर्थिक हितासाठी विमा गरजेचा असतो. तो सावधपणे घ्या, बारकाईने माहिती तपासा. कुणी स्वस्तात देतोय म्हणून फसू नका.

-रमाकांत सुतार, विमा प्रतिनिधी

Auto Insurance Sector
पंतप्रधान सूर्य घर योजनेची पोस्टात 'अशी' करा नोंदणी; एक कोटी घरे होणार प्रकाशमान, दरमहा 300 युनिट मोफत वीज

दुचाकी विमा गरजेचा

दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी अपवादानेच चोरीला गेलेली गाडी सापडते. त्यामुळे दुचाकीचा पूर्ण विमा करणे फायद्याचे ठरते. हे करताना दुचाकीच्या दोन्ही ओरिजनल किल्ल्या मात्र सांभाळून ठेवा. ते फार महत्त्वाचे असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.