Freezer Tips : फ्रिजरमध्ये बर्फ तयार होतोय पण आईसक्रिम काही तयार होईना! असं नेमकं का होतं? जाणून घ्या

एप्रिल महिना आलाय आणि प्रचंड उकाडा जाणवतोय
Freezer Tips
Freezer Tipsesakal
Updated on

Freezer Tips : एप्रिल महिना आलाय आणि प्रचंड उकाडा जाणवतोय. त्यामुळे थंड खाण्याचा आणि पिण्याचा मोह आवरता येत नाही. या काळात फ्रिजचा वापर सर्वाधिक होतो. घरात फ्रिज नसेल तर उन्हाळ्याचे दिवस व्यवस्थितपणे काढणं कठीण होतं. अनेकदा काही पदार्थ जमवण्यासाठी डीप फ्रिजरचा वापर केला जातो.

Freezer Tips
Jeep Meridian Upland And Meridian X Price जीपचे दोन स्पेशल एडिशन लाँच

पण कधी कधी फ्रिजरमध्ये बर्फ तर तयार होतो पण इतर पदार्थ आईस्क्रीम तयार करणं कठीण होतं. तेव्हा नेमका प्रश्न पडतो की नेमकं काय झालं असावं. फ्रिजरमध्ये काही समस्या असती तर बर्फही जमला नसता. मग नेमकं असं काय झालं आहे की साधं आईसक्रिमही तयार होत नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तुमच्या फ्रिजचीही अशीच समस्या असेल तर त्यामागचं कारण समजून घ्या.

Freezer Tips
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

जेव्हा फ्रिजमध्ये एकही पदार्थ थंड होत नाही. तेव्हा आपण समजू शकतो की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तसेच फ्रिज दुरुस्त करण्याची गरज आहे. पण कधी असं होतं की बर्फ तयार होतो पण इतर पदार्थ्यांच्या बाबतीत वेगळंच चित्र पाहायला मिळतं. सर्वात पहिलं कारण म्हणजे फ्रिजमधील कंप्रेसर वस्तू थंड ठेवत असतो. पण त्याचं तापमान हवं तितकं नसल्याने आइसक्रिम तयार होत नाही.

Freezer Tips
Most Demanding Cars In India : लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या 5 गाड्या

द्रवरूप पाण्याचं बर्फाच्या घनरुपात रुपांतर होण्यासाठी 0 डिग्री तापमान आवश्यक असतं. 0 डिग्री तापमानावर द्रवरूप पाण्याचं बर्फात रुपांतर होतं. पण आईसक्रिम जमवण्यासाठी कमीत कमी उणे 12 डिग्री तापमानाची गरज असते. त्यामुळे फ्रिजमध्ये बर्फ जमत असेल आणि आईसक्रिम वितळत असेल तर कंप्रेसर तितका थंडावा देत नाही याचा अंदाज येतो.

Freezer Tips
Upcoming Tata Cars : आता टाटाच्या या दोन गाड्यांमध्ये मिळणार इलेक्ट्रिक आणि सीएनजी पॉवरट्रेन

दुसरीकडे फ्रिजरचं तापमान व्यवस्थित ठेवणारे एअर व्हेंट्स व्यवस्थितरित्या काम करत नसल्याचं दिसून येतं. थंड हवा फ्रिजमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचत नसल्याने पदार्थ हवे तसे थंड होत नाहीत. इतकंच काय तर एअर व्हेंट्स व्यवस्थित काम करत नसल्याने आइसक्रिम जमत नाही. त्याचबरोब फ्रिजमध्ये काहीच पदार्थ नसतील तरी आइसक्रिम जमण्यास प्रॉब्लेम होतो. कारण फ्रिजरमधील सामाना थंड हवा बांधून ठेवतात. त्यामुळे आइसक्रिम जमण्यास मदत होते.

Freezer Tips
Tata IPhone : आता टाटाही तयार करणार आयफोन, किंमतीत होणार का घट?

गाडीवर किंवा डोक्यावर टोपली घेऊन आइसक्रिम विकणारे लोकं बर्फामध्ये मीठ टाकतात. असं का करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर मीठामुळे बर्फ लवकर वितळत नाही. त्यामुळे आइसक्रिम फार काळ टिकतं आणि लवकर वितळत नाही. त्यामुळे बर्फात मीठ टाकलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.