Refrigerator tips for Summer : आजकाल बहुतांश घरांमध्ये फ्रीज दिसून येतो. उन्हाळ्यात तर फ्रीजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. थंड पाणी पिण्यासाठी असो, वा अन्न खराब होऊ नये म्हणून असो.. उन्हाळ्यात फ्रीज घरात असणं ही एक मोठी जमेची बाजू असते. मात्र हा फ्रीज अधिक काळ नीट रहावा, यासाठी त्याची योग्य काळजी घेणंही गरजेचं आहे.
कित्येक लोक उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं तापमान अगदी कमीत कमी ठेवतात. आतमध्ये ठेवलेल्या वस्तू अधिक लवकर थंड व्हाव्यात या हेतूने ही सेटिंग केली जाते. मात्र, असं करणं चुकीचं आहे. असं केल्यामुळे तुमचा तात्पुरता फायदा होईल, मात्र तुमच्या फ्रीजचं आयुष्य कमी होईल हे लक्षात घ्या.
आजकाल सर्व फ्रीजमध्ये विविध प्रकारच्या टेम्परेचर सेटिंग्स मिळतात. काही हायटेक फ्रीजमध्ये टेम्परेचरसोबत वेगवेगळे 'मोड्स' देखील देण्यात आलेले असतात. समर, विंटर असे दोन मोड जर तुमच्या फ्रीजमध्ये उपलब्ध असतील; तर उन्हाळ्यात समर मोडवर तापमान सेट करणं योग्य राहील.
तुमच्या फ्रीजमध्ये जर असे मोड्स दिलेले नसतील, तर टेम्परेचर नॉब फिरवून तुम्ही त्याचा स्पीड कमी-जास्त करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील टेम्परेचर सगळ्यात कमी न ठेवता, त्याहून थोडंसं जास्त ठेवणं फायद्याचं ठरतं. यामुळे तुमच्या फ्रीजचं आयुष्य वाढतं, आणि वीजेचीही मोठ्या प्रमाणात बचत होते.
सगळ्यात कमी तापमान ठेवल्यानंतर आतमधील पदार्थ अधिक सुरक्षित राहतील असं कित्येकांना वाटतं. मात्र, हा मोठा गैरसमज आहे. कूलिंगचा स्पीड अधिक ठेवल्यास आत ठेवलेल्या अन्नावर बर्फाचा थर जमा होऊ शकतो, ज्यामुळे ते अन्न खराब होऊ शकतं
याशिवाय सगळ्यात कमी तापमान ठेवल्यास आतील गोष्टी गार करण्यासाठी फ्रीजची भरपूर उर्जा खर्च होते. यामुळे वीजेचा अधिक वापर होतो आणि त्याचा वीजबिलावर परिणाम होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.