फेसबुकने वापरकर्त्यांच्या प्रोफाइलमधून चार माहितीशी संबंधित असणारे पर्याय काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून फेसबुक कोणत्याही वापरकर्त्याचे पत्ते, धार्मिक विचार, राजकीय विचार आणि लैंगिक प्राधान्ये दाखवणार नाही.
हे बदल सर्वप्रथम सोशल मीडिया सल्लागार मॅट नवारा यांनी पाहिले. ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत नवारा यांनी लिहिले की, "फेसबुक 1 डिसेंबर 2022 पासून प्रोफाईलमधून धार्मिक दृष्टिकोन आणि माहितीमध्ये 'रुची' असे असणारे पर्याय काढून टाकत आहे."
हेही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?
आतापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्वतंत्र पेज होते ज्यात पत्ता, राजकीय विचार आणि लैंगिक माहिती यासारखे तपशील होते जे वापरकर्त्यांना भरायचे होते. परंतु आता फेसबुकने हे तपशील काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक आता ज्यांनी अगोदर हे पर्याय भरलेले आहेत अशा वापरकर्त्यांना सूचना पाठवत आहे, फेसबुक त्यांना त्यांच्या प्रोफाइलमधून काढून टाकल्या जाणार्या माहितीची माहिती देत आहे.
मेटाचे प्रवक्ते एमिल वाझक्वेझ म्हणाले, "Facebook ला नेव्हिगेट करणे आणि वापरणे सोपे करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही काही प्रोफाईल पर्याय काढून टाकत आहोत. इथून पुढे आता आवड, धार्मिक विचार, राजकीय दृश्ये आणि पत्ता हे पर्याय दिसणार नाहीत. ज्यांनी ही माहिती भरली आहे त्यांना आम्ही सूचना पाठवत आहोत. त्यांना कळवल्या नंतर हे पर्याय काढून टाकले जातील.,"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.