ChatGPT Investigation: यूएस फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) ग्राहक संरक्षण नियमांचे उल्लंघन आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल ChatGPT विकसित करणाऱ्या OpenAI या कंपनीची चौकशी सुरू केली आहे.
ओपनएआयने गेल्या वर्षी ChatGPT हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित मॉडेल सादर केले. तेव्हापासून हा चॅटबॉट लोकांमध्ये सतत चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, यादरम्यान चॅटजीपीटीवर प्रसिद्ध झालेल्या काही माहितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, FTC ने ChatGPT च्या निर्मात्या OpenAI ला 20 पानांची नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.
या नोटीसमध्ये एआय तंत्रज्ञान, उत्पादने, ग्राहक, गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठीचे उपाय आणि डेटा संरक्षण तरतुदींबद्दल तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे.
FTC तपास करत आहे
एफटीसीच्या प्रवक्त्याने गुरुवारी ओपनएआय विरुद्ध तपास सुरू असण्यावर कोणतेही भाष्य केले नाही. अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉशिंग्टन पोस्ट' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, FTC तपास करत आहे की, OpenAI ग्राहकांची गोपनीयता, डेटा सुरक्षा यांचा चुकीचा वापर करत आहे का? तसेच ग्राहकांच्या हिताचे नुकसान करत नाही ना?
ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी चौकशीचा अहवाल सुरू होताच एका ट्विटमध्ये आपली निराशा व्यक्त केली. या निर्णयामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होणार नाही परंतु कंपनी व्यापार आयोगाला सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
ऑल्टमन यांनी ट्विट केले
ऑल्टमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तंत्रज्ञान सुरक्षित आणि ग्राहकांसाठी अनुकूल आहे आणि आम्ही कायद्याचे पालन करतो याची आम्हाला खात्री आहे. आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचे रक्षण करतो.
याआधी मे महिन्यात ऑल्टमन अमेरिकन काँग्रेससमोर हजर झाले होते. याशिवाय, त्यांनी युरोपियन देश आणि भारतातही प्रवास केला आहे आणि AI वर नियमन करण्यावर त्यांनी त्यांची बाजू मांडली होती.
किंबहुना, ChatGPT आणि इतर काही AI उपायांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यांच्या संभाव्य धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.