Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेचे उद्या पडणार पहिले पाऊल; कसे आहे स्पेसक्राफ्ट? घ्या जाणून

गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे.
Gaganyaan Mission
Gaganyaan MissionEsakal
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्थेचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेल्या ‘गगनयान’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेच्या अंतर्गत गगनयानची पहिली उड्डाण चाचणी २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.

शनिवारी (२१ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. या उड्डाण चाचणीनंतर आणखी ३ चाचणी पूर्ण करण्यात येणार आहेत.

इस्त्रोकडून अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ही उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. मिशन गगनयान टीव्ही डी १ ची उड्डाण चाचणी झाल्यानंतर गगनयान कार्यक्रमांतर्गत आणखी ३ परीक्षणं यानाचे मिशनही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी मंगळवारी दिली आहे.

Gaganyaan Mission
Gaganyaan: गगनयान मिशनच्या टेस्टिंगची तारीख ठरली! जाणून घ्या डिटेल्स

ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेसाठी अंतराळयानाला पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्त्रोचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

स्पेसक्राफ्टमध्ये काय असणार ?

गगनयान मोहिमेची ही पहिली उड्डाण चाचणी जर यशस्वी झाली, तर उर्वरित पात्रता चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा टप्पा चांगल्या प्रकारे निश्चित करण्यास मदत होईल.

ज्यामुळे, भारतीय अंतराळवीरांसह पहिला गगनयान कार्यक्रम सुरू करण्यासाठी देखील याची मदत घेण्यात येईल. हा गगनयान मोहिम २०२५ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये क्रू इंटरफेस, लाईफ सपोर्ट सिस्टिम, एव्हीओनिक्स आणि डिसेलेरेशन सिस्टिम असणार आहे.

Gaganyaan Mission
Gaganyaan Mission : अंतराळवीर 3 दिवस राहणार अंतराळात जाणून घ्या काय वेगळं आहे इस्रोच्या गगनयान मोहीमेत

विशेष म्हणजे अंतराळयान पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीवर आल्यानंतर ते समुद्रात सुरक्षितपणे उतरवणे, यासाठी यानाची खास रचना करण्यात आली आहे. तसेच, या दरम्यान, क्रूच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि ते पुन्हा प्रवेश करण्यासाठी अंतराळयान खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.

श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून या यानाची उड्डाण चाचणी होण्यापूर्वी क्रू मॉड्यूलवर ISRO तर्फे विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता गगनयान मोहिमेची उद्या होणारी पहिली उड्डाण चाचणी यशस्वी होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Gaganyaan Mission
ISRO Gaganyaan Mission : इस्रोच्या 'गगनयान' मोहिमेच्या तयारीला वेग; ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.