Galaxy Tab A7 Lite Kids Edition : घरातली लहान मूलं तासंतास मोबाईलनर गेम खेळत असतात. तर, काही अगदी लहान बाळ त्यांची आवडती गाणी पाहत असतात. प्रत्येक घरात हे चित्र बघायला मिळते.
पण, काहीवेळा तूमचा एखादा महत्त्वाचा कॉल आला किंवा कामासाठी मोबाईल हवा असेल तरी मूलांकडून मोबाईल मिळवणं म्हणजे एक अग्निदीव्यच समजावे. पण, आता काळजी करू नका. कारण मोबाईल क्षेत्रातली टॉपची कंपनी असलेल्यी सॅमसंगने पालकांच्या या समस्येवर एक तोडगा काढला आहे. त्यांनी लहान मूलांसाठी टॅबलेट लाँच केला आहे.
सॅमसंगने अमेरिकेत मुलांसाठी एक नवीन टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबलेटला Galaxy Tab A7 Lite Kids Edition असे नाव देण्यात आले आहे. अमेरीकेत त्यांची विक्री सुरू झाली आहे.हा नवा टॅब Galaxy Tab A7 Lite Kids Edition 2021 मध्ये लॉन्च झालेल्या Galaxy Tab A7 Lite ऍडीशनवर आधारित आहे.
लहान मुलांकडून अनेकदा मोबाईल पडतो, फुटतो. त्यामुळे या टॅबला पडल्यावर काही होऊ नये यासाठी जाड कव्हर बसवण्यात आला आहे. टॅब पाण्यात पडला तरी त्याला काही होणार नाही, याचीही काळजी यात घेण्यात आली आहे. यात 360-डिग्री स्विव्हल स्टँड देखील आहे. त्यामुळे मुले टॅबलेट दूर ठेऊनही पाहू शकतात.
काय आहेत टॅबचे फिचर्स
या टॅबमध्ये 8.7-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून तो MediaTek Helio P22T चिपसेटद्वारे काम करतो. यामध्ये प्रोसेसर 3GB RAM आहे तर डिव्हाइसला 32GB स्टोरेज देण्यात आले आहे. या टॅबलेटला 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे.
मुलांसाठी सुरक्षित टॅब
मूले टॅबलेटवर काय आणि किती वेळ खेळतात, यावर पालकांना नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यासाठी एक ऍप टॅबमध्ये देण्यात आले आहे. तर, मुलांना आणि पालकांना टॅबलेट कसे हाताळावे त्याचे फंक्शन्स कोणते आहेत. याची माहिती व्हावी यासाठी एक ऍप्लिकेशन सुरूवातीपासूनच टॅबलेटमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहे.
किती आहे किंमत
Galaxy Tab A7 Lite Kids Edition ची किंमत एटीएंडटी किंमत $250 डॉलर म्हणजे 20,676 इतकी आहे. Galaxy Tab A7 Lite आता 9,014 इतक्या रूपयांना मिळत आहे. हा नवीन टॅबलेट 4 नोव्हेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.