Gemini Double Check : एआय निर्मित कंटेंटचं गुगलवर करता येणार डबल व्हेरिफिकेशन; जेमिनीने आणलं नवीन फिचर,अजून काय खास?

AI Double Check Feature : Google च्या Gemini नावाच्या AI चॅटबॉटमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या माहितीची सत्यता तुम्ही थेट Google च्या मदतीने तपासू शकणार आहात.
Double-Check AI Information in Google Gemini with Search Integration
Double-Check AI Information in Google Gemini with Search Integrationesakal
Updated on

Gemini New Feature : आपण आता तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. सर्वकाही स्मार्ट आणि तंत्रज्ञानाच्या वापराणे पुढे जात आहे. अश्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) देखील मागे पडलेले नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर वाढत चालला आहे. पण या AI मॉडेल्सकडून मिळणाऱ्या माहितीमध्ये कितीतरी वेळा चुका असण्याची शक्यता असते. यामुळेच माहितीचा स्रोत आणि विश्वासार्हता तपासणे महत्वाचे असते.

आता Google च्या Gemini नावाच्या AI चॅटबॉटमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या माहितीची सत्यता तुम्ही थेट Google च्या मदतीने तपासू शकता. Gemini चॅटबॉट एखाद्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यानंतर, त्या उत्तराखाली तुम्हाला "डबल-चेक रिस्पॉन्स" (Double-check response) असा एक पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर Google तुम्हाला दिलेल्या माहितीशी संबंधित माहिती वेबवरून शोधून काढेल. म्हणजेच, Gemini ने दिलेल्या माहितीची खरी-खोटी तुम्ही थेट Google वरून तपासू शकणार आहात.

Double-Check AI Information in Google Gemini with Search Integration
Mobile Storage Tips : मोबाईलचं स्टोरेज झालंय फुल? महत्वाचा डेटा न गमावता मिनिटात मिळेल फ्री स्पेस,वापरून पाहा 'या' स्मार्ट ट्रिक्स

हे काम अधिक सोपे करण्यासाठी, Google ने वेगवेगळ्या रंगांचा वापर करून माहितीचे वर्गीकरण केले आहे. जर मजकूर हिरवा असेल तर, त्याचा अर्थ Google ला त्या माहितीशी मिळतीजुळी माहिती वेबसाईटवर सापडली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल.

योग्य मजकूर नसेल तर, त्याचा अर्थ Google ला त्या माहितीशी संबंधित काहीही माहिती वेबसाईटवर सापडली नाही. शेवटी, जर काही मजकूर हायलाइट नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, त्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी पुरेसा डाटा Google ला वेबवरवर मिळालेला नाही.

AI चॅटबॉट्समधून मिळणाऱ्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी Google चा हा "डबल-चेक रिस्पॉन्स" पर्याय खूप ठरणार उपयुक्त आहे.

Double-Check AI Information in Google Gemini with Search Integration
Nokia 5G Launch : नोकियाची धमाकेदार एन्ट्री! या 5G कीपॅड स्मार्टफोनची एक झलक तुम्हाला मोहून टाकेल; जाणून घ्या फीचर्स अन् आकर्षक किंमत

आता हे पाहणे जास्त मनोरंजक असेल की या नव्या फीचरचा वापर लोक किती चांगल्याप्रकारे करतात.गुगल जेमिनीचा वापर करून आपण करू शकतो. त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडियावर देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत चालला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होते आणि सुधारणा करता येतात परंतु या नव्या गोष्टी शिकत असताना जी माहिती आपल्याला मिळते ती अगदी तंतोतंत बरोबरच असेल यामध्ये खात्री व्यक्त करता येत नव्हती.

Double-Check AI Information in Google Gemini with Search Integration
Lunar Cave Discovery : काय सांगता! चंद्रावर सापडली गुहा; शास्त्रज्ञांनी जगाला दिली आश्चर्यकारक माहिती

पण आता जेमिनीकडून दिल्या जाणाऱ्या या नव्या सुविधेमुळे आपल्याला आपण सर्च केलेली कोणतीही माहिती अगदी क्षणातच योग्य आहे की अयोग्य, त्याच्यामध्ये काही बदल आहे का किंवा ती माहिती खोटी आहे का याबद्दल सविस्तर माहिती लगेच स्क्रीनवर दिसेल. याच्यामुळे गुगल जेमिनीचा वापर अधिकच सोयीस्कर होणार आहे यात शंका नाही. हे नवीन फीचर गुगल जेमिनी वापरणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांच्या पसंतीस उतरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.