Gemini AI in Gmail :  ईमेलला उत्तर द्यायचंय! आता नो टेंशन; Gemini Gmail करणार सगळी मदत,वापरुन तर बघा

Collaborate with Gemini in Gmail : Google त्यांच्या अत्याधुनिक AI टूल Gemini ला Gmail मध्ये घेऊन आले आहे. वेब आणि मोबाइल अँप्समध्ये आता Gemini ची ताकद जोडली गेली आहे.
Gemini in Gmail
Gemini in GmailSakal
Updated on

Gemini in Gmail : जगभरातले कोट्यवधी लोक जीमेल वापरत आहेत. थोडक्यात जिमेल आपल्या टेक जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. अश्यातच जीमेल बद्दल एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्या Gmail ची कटकट आता संपली आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी जीमेलमध्ये जेमिनीए एंट्री घेतली आहे.

कारण Google त्यांच्या अत्याधुनिक AI टूल Gemini ला Gmail मध्ये घेऊन आले आहे. Gmail ची वेब आणि मोबाइल अँप्समध्ये आता Gemini ची ताकद जोडली गेली आहे. यामुळे ईमेल वाचण्याचा आणि त्यांना उत्तर देण्याचा अनुभव आता बेस्ट होणार आहे.

Gemini नेमके काय करते?

  • ईमेल सारांश (Summarization): Gemini लांबलचक ईमेल चॅट्सचे सारांश तयार करतो. त्यामुळे मोठ्या संभाषणांवर पटकन नजर टाकणे आता सोपे होईल.

  • उत्तर सुचवते (Response Suggestions): आता इमेलला उत्तर कसे द्यावे याचा विचार करण्याची गरज नाही. कारण Gemini तुमच्यासाठी उत्तरांचे सल्ले देतो. त्यामुळे तुम्ही इलेम वाचून पटकन रेडिमेड उत्तर देऊ शकता.

  • ईमेल लिहिण्यात मदत (Drafting Assistance): ईमेल लिहिण्यात अडचण येत असल्यास Gemini मदत करतो. तो तुम्हाला योग्य आणि व्यावसायिक ईमेल लिहिण्यासाठी सल्ला देतो.

Gemini in Gmail
Sunita Williams Update: स्टारलायनर यान अंतराळवीरांना न घेताच पृथ्वीवर परतले; मग सुनीता विल्यम्स अंतराळात कुठे अन् कश्या राहतायत?
  • माहितीचा शोध घेते (Information Retrieval): तुमच्या इनबॉक्समधून किंवा Google Drive मधून विशिष्ट माहिती शोधायची आहे,जसे की "माझ्या एजन्सीचा PO नंबर काय आहे?" किंवा "पुढील टीम मीटिंग कधी आहे?" असे प्रश्न Gemini ला विचारू शकता. तुम्हाला Gmail Gemini गरजेची माहिती लगेच शोधून देईल.

  • Gmail ची मोबाइल अॅप (Android आणि iOS) मध्येही आता Gemini उपलब्ध आहे. ईमेल चॅट्सचे विश्लेषण करून त्यांचे महत्वाचे मुद्दे असणारा सारांश Gemini देतो. मोबाईलवर लांबलचक ईमेल वाचणे सोपे करण्यासाठी हा फीचर खास उपयुक्त आहे. लवकरच आणखी काही मोबाइल फीचर्स येणार आहेत जसे की Contextual Smart Reply आणि Gmail Q&A.

  • हे नवीन फीचर्स तुमच्या वेळेची बचत करून ईमेल वाचणे, ते समजून घेणे आणि उत्तर देणे अधिक कार्यक्षम करतील. Gmail सोबतच Google Docs, Sheets, Slides आणि Drive सारख्या इतर Google Workspace अॅप्समध्येही Gemini काम करतो. त्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता आणखी चांगल्याप्रकारे वाढते.

Gemini in Gmail
iPhone SE 4: ॲपलचा स्मार्टफोन खरेदी करायचाय? लवकरच लाँच होतोय iPhone SE 4; फीचर्स आयफोनसारखे पण किंमत अगदी कमी

Gemini AI कसे सुरु करायचे?

  • Gemini सुरु करण्यासाठी Admin console मध्ये smart features आणि personalisation चालू असल्याची खात्री करावी. Gmail मध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या "Ask Gemini" स्टार बटण दाबून Gemini ला ॲक्टिव करू शकता. मोबाईलवर एखाद्या ईमेल चॅटमध्ये "summarize this email" दाबून Gemini ला वापरता येते.

  • Gmail Gemini कधी सुरू होणार? 24 जून 2024 पासून रोलआउट सुरु झाली आहे. Rapid Release domains ला 1-3 दिवसांत तर Scheduled Release domains ला 15 दिवसांपर्यंत सर्व फीचर्स दिसतील.

  • Gemini खास Google Workspace ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे खालीलपैकी एखादी subscription आहे- Gemini Business and Enterprise, Gemini Education and Education Premium, आणि Google One AI Premium.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.