Electric Scooter : 60 हजारांमध्ये खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; 'ही' कंपनी देतेय मोठा डिस्काउंट!

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर म्हटलं की ओला, एथर या दोनच कंपन्यांची नावं समोर येतात. मात्र आणखीही बऱ्याच कंपन्या चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स तयार करत आहेत.
Gemopai Electric Scooter
Gemopai Electric ScootereSakal
Updated on

Electric Scooter Price Drop : भारतातील इलेक्ट्रिक व्हीकल मार्केट अगदी वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. मात्र, या स्कूटरच्या किंमती अजूनही इतर स्कूटरच्या तुलनेत अधिक असल्याचं कित्येकांचं मत आहे. यातच Gemopai या कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे अवघ्या 60 हजार रुपयांपासून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर म्हटलं की ओला, एथर या दोनच कंपन्यांची नावं समोर येतात. मात्र आणखीही बऱ्याच कंपन्या चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स तयार करत आहेत. Gemopai कंपनीने या स्पर्धेत टिकण्यासाठी कमी किंमतीत हाय-क्वालिटी इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्या आहेत.

या कंपनीच्या Astroid Lite या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तब्बल 200 किलोमीटरची रेंज मिळते. तसंच तीन सेकंदांमध्ये ही स्कूटर 0 ते 40 किलोमीटर एवढा स्पीड पकडते. यामध्ये सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स मिळतात. या स्कूटरला 1,11,195 रुपयांना लाँच करण्यात आलं होतं. मात्र आता याची नवी किंमत 99,195 रुपये एवढी करण्यात आली आहे.

Gemopai Electric Scooter
Emotorad : कशी आहे धोनीने जाहिरात केलेली इलेक्ट्रिक सायकल? किती आहे किंमत? जाणून घ्या

Ryder SuperMax या स्कूटरमध्ये 100 किलोमीटर रेंज मिळते. मात्र यामध्ये 60 किलोमीटर प्रतितास एवढा टॉप स्पीड मिळतो. ही स्कूटर 79,999 रुपयांना लाँच करण्यात आली होती. यावर आता तब्बल 10 हजारांची सूट देण्यात येत आहे. यामुळे स्कूटरची नवी किंमत 69,999 रुपये झाली आहे.

कंपनीने आपल्या Ryder मॉडेलमध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट जाहीर केला आहे. 120 किलोमीटर रेंज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 70,850 रुपये होती. आता ही किंमत 59,850 रुपये एवढी झाली आहे. कॅशबॅक ऑफर अंतर्गत ही सूट दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.