Blue Tick on Instagram: तुम्हालाही इंस्टाग्रामवर 'ब्लू टीक' हवीय? जाणून घ्या सोपी व्हेरिफिकेशन प्रोसेस

How to get Blue Tick on Instagram
How to get Blue Tick on Instagram
Updated on

How to get Blue Tick on Instagram: इंस्टाग्राम हे जगातील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग अॅप आहे, तुमच्या पैकी कितीतरी जण हे वापरत देखील असाल. सध्या, इंस्टाग्रामवर सक्रिय वापरकर्त्यांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. दरम्यान काही लोकांट्या अकाउंटवर तुम्हाला ब्लू टीक पाहायला मिळते ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करावे लागते.

इंस्टाग्राम अॅपमध्येच यूजर्सना अकाउंट व्हेरिफिकेशनची सुविधा मिळते. हे व्हेरिफिकेशन पूर्ण करून, तुम्ही Instagram वर ब्लू टिक मिळवू शकता. तुम्हाला ब्लू टिक मिळवण्यासाठी एका सोप्या नोंदणी प्रक्रियेतून जावे लागेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या पार कराव्या लागतील. यासाठीची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत.

How to get Blue Tick on Instagram
Airtel 5G vs Jio 5G: कोण देईल चांगली सेवा? दोन्हीत नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

इन्स्टाग्रामवर पडताळणीसाठी काय करावं?

स्टेप 1- तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि प्रोफाइल पेजवर जा. त्यानंतर उजवीकडे वरती ड्रॉप-डाउन मेनू उघडा.

स्टेप 2- मेनू उघडल्यानंतर अकाउंट (Account) वर टॅप करा आणि नंतर रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन ( Request Verification) वर क्लिक करा.

स्टेप 3- विचारलेली सर्व माहिती भरा. यातील सर्व पर्याय तुम्हाला भरावे. ते भरल्यानंतर send वर ​​क्लिक करा.

स्टेप 4 - जर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंस्टाग्राम अकाउंटमध्ये वापरायचे असेल तर तुम्हाला पूर्ण नाव भरावे लागेल. जर तुमचे खाते व्यवसाय खाते असेल, तर तुम्हाला अधिकृत ओळखपत्रासह Honor चे पूर्ण नाव टाइप करावे लागेल. जर तुम्ही वैयक्तिक खाते (Personal Account) सांभाळत असाल तर तुम्ही टोपणनाव वापरू शकता. परंतु व्यवसाय खात्यासाठी (Business Account) तुम्हाला कंपनीचे नाव टाइप करावे लागेल.

स्टेप 5 - यानंतर तुम्हाला आयडीचा फोटो अपलोड करावा लागेल. फाइल अपलोड करण्यासाठी अपलोड पर्याय निवडावा लागेल. अपलोड केल्यानंतर send वर ​​क्लिक करा.

How to get Blue Tick on Instagram
High Court : 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; कोर्टाचा मोठा निर्णय

या प्रकारे तुम्ही तुमचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुर्ण होते, यानंतर इंस्टाग्रामकडून प्रतिसाद मिळण्याची वाट पाहावी लागेल. जर तुमचे व्हेरिफिकेशन रिजेक्ट झाले तर ३० दिवसांनंतर तुम्ही पुन्हा नव्याने व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.