Online Shopping Discount : अनके ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विविध प्रोडक्ट्सवर सध्या भारी सूट मिळतेय. सध्या होळीचं सीजन आहे आणि या सीजनमध्ये घरातील वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेसपर्यंत नवीन स्मार्ट उपकरणांची खरेदी वाढते.
या सीझनमध्ये प्रोडक्ट्सवर आवश्यकतेपेक्षा जास्त डिस्काउंट देखील मिळतो, पण जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रोडक्ट्सबद्दल सांगणार आहोत ज्यावर जास्तीत जास्त सूट मिळत आहे.
काही भन्नाट ऑफर वाचून तुमचा त्यावर विश्वाससुद्धा बसणार नाही, चला तर जाणून घेऊया कुठल्या प्रोडक्टवर किती सुट मिळतेय ते.
जर तुम्ही लॅपटॉप खरेदीसाठी ऑफलाइन प्लॅटफॉर्म निवडत असाल, तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातील. कारण यावेळी तुम्हाला ऑनलाइन खरेदीवर 30% ते 60% सूट मिळेल, ज्यामुळे तुमची खूप बचत होईल.
स्मार्टफोन अॅक्सेसरीजच्या खरेदीवर ग्राहकांना 30 ते 50 टक्के सवलतही दिली जात आहे आणि जर एखाद्या ग्राहकाला ती ऑनलाइन शॉपिंगमधून घ्यायची असेल तर मोठ्या प्रमाणात बचत करता येईल.
जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर स्मार्ट एलईडी टीव्हीवरसुद्धा भरपूर सूट दिली जात आहे आणि ग्राहकांना यावर 40% ते 80% पर्यंत सूट मिळू शकते, ज्यामुळे तुमची खूप बचत होऊ शकते.
तुम्हाला लॅपटॉपच्या ऑनलाइन खरेदीवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे आणि तुम्ही कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवरून लॅपटॉप खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते.
ऑनलाइन शॉपिंग दरम्यान स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला चांगली सूट मिळू शकते आणि विविध कंपन्या यावर 20% ते 40% पर्यंत सूट देत आहेत,तेव्हा या बंपर ऑफरचा तुम्ही बिनधास्त फायदा घेऊ शकता.सोबतच पैशांचीदेखील बचत होईल.
ऑनलाइन प्रोडक्ट्स ऑर्डर करण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही कॅश ऑन डिलीव्हरी हे प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता. हे प्रोडक्ट्स ऑनलाइन असले तरी तुम्हाला यावर गॅरंटी आणि वॉरंटी दिली जाते. तेव्हा या प्रोडक्ट्समध्ये कुठलाही बिघाड आल्यास तुम्ही लगेच कंम्प्लेंट करून प्रोडक्ट रिपेअरींगसाठी रिक्वेस्टसुद्धा करू शकता. वॉरंटी जायच्या आत तुम्ही असे केल्याल तुम्हाला मोफत रिपेअरींग सेवा उपलब्ध करून दिली जाते. (Discount Offer)
त्यामुळे ऑनलाइन प्रोडक्ट घेताना कुठलीही भिती बाळगण्याचे कारण नाही. तुम्हाला प्रोडक्ट न आवडल्यास तुम्ही रिटर्न सुद्धा करू शकता. तुमचे पैसेसुद्धा तुम्हाला परत मिळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.