Geyser Buying Guide : नवीन गिझर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या; अन्यथा करावा लागेल पश्चाताप

Which Geyser to buy : गिझरचे साधारणपणे दोन प्रकार असतात, स्टोरेज आणि इन्स्टंट.
Geyser Buying Guide
Geyser Buying GuideeSakal
Updated on

Geyser Buying Tips : दिवाळी सोबतच आता देशभरात थंडीची चाहूल लागली आहे. यामुळेच कित्येक लोक आता गिझर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तुम्हीदेखील या हिवाळ्यात गिझर घेणार असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

गिझरचे प्रकार लक्षात घ्या

गिझरचे साधारणपणे दोन प्रकार असतात, स्टोरेज आणि इन्स्टंट. स्टोरेज गिझरमध्ये पाणी गरम होतं आणि साठूनही राहतं. तर इन्स्टंट गिझरमध्ये पाणी केवळ तुम्ही वापरताना गरम होतं. इन्स्टंट गिझरची किंमत कमी असते. या बातमीमध्ये आपण केवळ इलेक्ट्रिक गिझरबाबत (Electric Geyser) जाणून घेणार आहोत.

Geyser Buying Guide
Nagpur Weather : यंदा विदर्भातील हिवाळा सामान्यच, डिसेंबरमध्ये गारठणार; पूर्वार्धात गुलाबी, तर उत्तरार्धात हुडहुडी

कोणी काय घ्यावं?

इन्स्टंट गिझर हा एकट्या व्यक्तीसाठी किंवा दोन-तीन जणांच्या कुटुंबांसाठी योग्य ठरतो. आकार लहान असल्यामुळे छोट्या बाथरुममध्ये देखील हे ठेवता येतं. तसंच, किचनमधील वापरासाठी हवं असेल, तरी इन्स्टंट गिझरचा पर्याय योग्य ठरतो. याची किंमत कमी असते, मात्र यामध्ये विजेचा वापर जास्त होतो.

मोठं कुटुंब असेल तर स्टोरेज गिझर घेणंच फायद्याचं ठरतं. चार किंवा त्याहून अधिक लोक असणाऱ्या कुटुंबात 15 ते 35 लीटर क्षमतेचा स्टोरेज गिझर घेणं योग्य ठरतं. तुमचं बजेट जास्त असेल तर छोट्या कुटुंबात देखील तुम्ही हा पर्याय निवडू शकता.

स्टार रेटिंग

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना त्याची स्टार रेटिंग पाहणं गरजेचं आहे. फ्रीज, टीव्ही, गिझर अशा गोष्टी आपण पुढील काही वर्षे वापरण्याचा विचार करून घेतो. त्यामुळे शक्यतो 4 किंवा 5 स्टार रेटिंग असलेलाच गिझर घेणं फायद्याचं ठरेल. त्यापेक्षा कमी रेटिंग असणारा गिझर हा तुमचं लाईट बिल वाढवू शकतो. (Tech News)

Geyser Buying Guide
Health Care News: हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

सुरक्षेची हमी

गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटनांबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे थोडेसे पैसे वाचवण्यासाठी हलक्या क्वालिटीचा गिझर घेणं टाळा. चांगल्या कंपनीचा, सुरक्षेची हमी देणारा आणि सेफ्टी फीचर्स असणारा गिझर घेणंच उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.