AI-Gmail Login Scam : एआय वापरताना जीमेल लॉगिन केलंय? तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम; सर्व अकाउंट हॅक, नेमकं प्रकरण काय?

AI scam gmail users online fraud : जीमेल वापरकर्त्यांना नवीन AI घोटाळ्याचा धोका: बनावट खाते पुनर्प्राप्ती विनंत्या स्वीकारू नका
AI-Gmail Login Scam
AI-Gmail Login ScamSakal
Updated on

AI Gmail User Scam : जीमेल वापरकर्त्यांना लक्ष्य करणारा एक नवीन आणि गुंतागुंतीचा AI घोटाळा उघड झाला आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट खाते पुनर्प्राप्ती विनंत्या स्वीकारण्याची फसवणूक केली जाते,असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. IT तज्ञ सॅम मिट्रोव्हिक यांनी त्यांच्या अनुभवाविषयी माहिती दिली आहे. या घोटाळ्याच्या आक्रमक पद्धतींमुळे लोक सहजपणे फसवले जाऊ शकतात.

काय आहे हा घोटाळा?

वापरकर्त्यांना अचानक फोन किंवा ईमेलद्वारे जीमेल खाते पुनर्प्राप्ती(Gmail Recovery) विनंती स्वीकारण्याचे संदेश येतात. ही विनंती साधारणत: वेगळ्या देशातून येते, सॅम यांच्या बाबतीत अमेरिकेतून रिक्वेस्ट आली होती.

AI-Gmail Login Scam
Gmail Account Inactive : उद्या तुमचं Gmail Account होणार बंद! आताच 'असं' करा सुरक्षित, कंपनीनं का घेतला निर्णय?

जर वापरकर्त्यांनी ही विनंती नाकारली, तर थोड्या वेळाने अधिकृत गुगल क्रमांकावरून फोन येतो, जो अत्यंत विश्वासार्ह वाटतो. फोनवरील व्यक्ती अत्यंत व्यावसायिक, विनम्र आणि अमेरिकन आवाजात बोलत, आपल्या खात्यावर संशयास्पद हालचाली असल्याची माहिती देतात. यात वापरकर्त्यांनी परदेशातून लॉगिन केले आहे का, यासारखे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास वाढतो. यानंतर, बनावट ईमेल पाठवून खाते पुनर्प्राप्ती विनंती स्वीकारण्याची मागणी केली जाते, जेणेकरून घोटाळेबाजांना पूर्णत: खाते नियंत्रण मिळवता येईल.

AI-Gmail Login Scam
Truecaller AI Scam Scanner : स्कॅमर्सवर लागणार लगाम; ट्रू कॉलरने लाँच केलंय हे नवीन AI फिचर

तुमचे जीमेल खाते सुरक्षित ठेवण्याचे उपाय-

1. जर तुम्हाला अनपेक्षित Recovery request आली, तर ती अजिबात स्वीकारू नका.

2. गुगल कधीही थेट फोन करत नाही. संशयास्पद फोन कॉल आले, तर त्याची पडताळणी करा.

3. ईमेल तपासा.गुगलकडून आलेल्या ईमेलमध्ये लहान चुकीच्या तपशिलांचा शोध घ्या, जसे की ‘To’ फील्ड किंवा डोमेन नाव.

4. सुरक्षितता तपासा. नियमितपणे आपल्या खात्याचे सुरक्षाविषयक हालचाली तपासा.

5. ईमेल हेडर तपासा. अधिक तांत्रिक वापरकर्त्यांसाठी, ईमेल हेडर तपासल्याने ईमेल खरी आहे की बनावट हे समजू शकते.

सतर्क राहून आणि ह्या स्टेप्स फॉलो करून वापरकर्ते अशा AI आधारित घोटाळ्यांपासून आपले संरक्षण करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.