तुमचा मेल रिसीव्हरने वाचला की नाही? ही सोपी ट्रिक वापरुन घ्या जाणून

Gmail tips know a simple way to find out if the mail receiver has read your mail or not check easy process
Gmail tips know a simple way to find out if the mail receiver has read your mail or not check easy process
Updated on

Gmail Trick : आपल्यापैकी बहुतेक लोकांना कोणत्या तरी कामासाठी मेल (Mail) करावे लागतता. त्याच वेळी, जेव्हा आपण एखाद्याला मेल करतो तेव्हा आपण त्या मेलच्या उत्तराची वाट पाहत असतो. बरात वेळ उत्तर आले नाही तरी आपल्या मनात प्रश्न येतो की, समोरच्या व्यक्तीने मेल पाहिला की नाही? पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मेलमध्ये अशी सुविधा देण्यात आलेली नाही, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीने मेल वाचला आहे की नाही हे कळू शकेल. पण चांगली बातमी अशी आहे की, आता तुमची समस्या दूर होऊ शकते.

आज आपण एक अशी युक्ती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही हे तपासू शकता की तुमचा मेल कोणत्या वेळी, कोणत्या दिवशी आणि किती वेळा पाहिला गेला आहे. हे करणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, चला जाणून घेऊया.

मेल रिसीव्हरने वाचला आहे का? चेक करा

यासाठी तुम्हाला गुगलवरील मेलट्रॅक एक्स्टेंशन वापरावे लागेल. हे करण्यासाठी, Google वर mailtrack extension टाइप करून सर्च करा. वेबसाइट उघडल्यावर Add to Chrome वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला Google अराउंट जोडण्यास सांगितले जाईल. ईमेल आयडी टाइप करून कनेक्ट करताच तुम्हाला मेलट्रॅक ईमेलचा एक्सेस मागीतला जाईल. येथे तुम्हाला Allow बटणावर क्लिक करा. असे केल्याने तुम्ही तुमच्या पाठवलेल्या सर्व मेल्स सहज ट्रॅक करू शकता.

Gmail tips know a simple way to find out if the mail receiver has read your mail or not check easy process
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी

आता ते एक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्हाला फोनमध्ये Gmail उघडावे लागेल आणि एक नवीन मेल तयार करावा लागेल. मेल तयार केल्यानंतर, पाठवण्यापूर्वी, सेंड बटणाच्या शेजारी असलेल्या तीन डॉट चिन्हावर क्लिक करा.

आता तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमध्ये Insert from Mailtrack नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला Track Email हा ऑप्शन निवडावा लागेल. असे केल्याने सेटिंग एक्टिव्हेट होईल. यानंतर आता तुम्ही Mailtrack च्या डॅशबोर्डवरून तुमचे पाठवलेले ईमेल सहज ट्रॅक करू शकता.

याशिवाय तुम्ही जीमेलच्या मोबाइल व्हर्जनवरही हे स्टेटस तपासू शकता. पण यासाठी तुम्ही मेलट्रॅक वापरून मेसेजला रिप्लाय दिलेला असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्ही प्रत्येक ईमेलच्या खाली दिलेल्या Available Add-ons पर्यायावर क्लिक करून सहज मेल ट्रॅक करू शकता.

Gmail tips know a simple way to find out if the mail receiver has read your mail or not check easy process
टाटाची SUV Safari चे डार्क एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.