AI and Household Chores : घराची कामं आणि त्यात बाहेरची कामं, ऑफिस, मुलांना सांभाळा, देवाचं कर, बापरे! किती तो त्रास, अशात कोणी मदतीलाही, अशावेळी वाटत की कोणीतरी असावं आपली सतत मदत करायला ज्याच्यावर आपण की कामं टाकू शकतो. आरामात सोफ्यावर बसून टिव्ही आणि व्हॉट्सअॅप बघू शकतो. कल्पना तशी चांगली आहे आणि खरी सुद्धा कशी? चला जाणून घेऊयात..
तंत्रज्ञानाने जग झपाट्याने बदलले आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या बदलाचा वेग आणखी वाढला आहे. त्यामुळे असं म्हणायला काहीच हरकत नाही पुढच्या १० वर्षांनी खरंच जग एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या साय-फाय कल्पनेसारखं दिसत असेल, जिथे रोबोट आपल्या घरात आपल्याला मदत करता आहेत.
AI ने मागच्या वर्षभरात प्रचंड प्रगती केली आहे, आपले अनेक नवीन प्लॅटफॉर्म लोकांसाठी खुले केले आहेत. Chat GPT आणि इतर AI प्राणलींद्वारे सॉफ्टवेअर विश्वात बरीच प्रगती केली आहे आणि AI लवकरच माणसाच्या मदतीसाठी ते रोबोट बनवू शकतात.
खरंतर अनेकांचा असा गैरसमज आहे की AI हे सॉफ्टवेअर किंवा कॉम्प्युटर फील्डशी कनेक्टेड आहे पण खरंतर AI चा सर्वात मोठा रोल हा मॅकेनिकल फील्डमध्ये आहे आणि गेली बरीच वर्ष यावर रिसर्च सुरु आहे.
यूके आणि जपानमधील संशोधकांनी ६५ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञांना १० वर्षांमध्ये सामान्य घरगुती कामांमध्ये ऑटोमेशनचे प्रमाण किती सांगण्यास सांगितले. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे किराणा खरेदीमध्ये सर्वात जास्त ऑटोमेशनची मदत होण्याची शक्यता आहे, पण तरुण किंवा वृद्धांची काळजी घेणे AI द्वारे होणे जरा कठीण वाटते आहे.
घरगुती कामांसाठी एकही रुपया घेणार नाही
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि जपानच्या ओचानोमिझू विद्यापीठातील संशोधकांना हे जाणून घ्यायचे होते की रोबोटचा पगार नसलेल्या घरगुती कामावर काय परिणाम होऊ शकतो, त्यांनी विचारले: "जर रोबोट आमची नोकरी घेतील, तर ते आमच्यासाठी कचरा देखील उचलतील का?"
रोबोट्स "घरगुती कामांसाठी", जसे की रोबोट व्हॅक्यूम क्लीनर "जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित आणि विकले जाणारे रोबोट बनले आहेत" असे संशोधकांचे निरीक्षण आहे.
महिला सक्षमीकरणाला चालना
महिलांवरील घरगुती कामाच्या असमान ओझ्याचा स्त्रियांच्या कमाईवर, बचतीवर आणि पेन्शनवर नकारात्मक परिणाम होतो, असे प्रोफेसर हर्टोग यांचे म्हणणे आहे. अशात जर तीच कामं करायला रोबोटने मदत केली तर हे काम खूप सोप्पं होऊन जाईल.
त्यामुळे बायकच्या कामाच ओझं थोडं हलकं होईल आणि त्यासाठी कोणतीही बाई लावण्याचीही गरज नाही आणि वाढत्या ऑटोमेशनमुळे लैंगिक समानता वाढू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
कोणते काम रोबोट करु शकेल?
१. घर झाडणे
२. घर पुसणे
३. स्वयंपाकात मदत करणे
४. भांडी घासणे
५. कपडे वाळत घालणे
कोणते काम रोबोट करु शकणार नाही?
१. लहान मुलांना सांभाळणे
२. लहानमुलांना बाहेर घेऊन जाणे
३. लहानमुलांकडून अभ्यास करुन घेणे
४. वयोवृद्ध लोकांची काळजी घेणे
५. शारीरिक बळ जास्त लागतं अशी कामं करणे
बजेटमध्येही पडेल फरक
संशोधनात असे सुचवले आहे की ऑटोमेशन विना मोबदला घरगुती कामासाठी मदत करेल, अशाने आपण आपल्या बाईला देत असलेल्या पैशांचीही बचत होईल. परिणामी आपला खर्च कमी होऊन सेव्हींग्स वाढतील.
याआधी कधी बनलेला असा रोबोट?
१९६६ मध्ये, टीव्ही शो टुमॉरोज वर्ल्डमध्ये एका घरगुती रोबोटबद्दल अहवाल दिला गेला जो रात्रीचे जेवण बनवू शकतो, कुत्र्याला चालवू शकतो, बाळाची काळजी घेऊ शकतो, शॉपिंग करू शकतो, कॉकटेल मिसळू शकतो आणि इतर अनेक कामे करू शकतो.
रोबोट कार सुद्धा चालवू शकतात
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील एआय आणि सोसायटीमधील सहयोगी प्राध्यापक आणि अभ्यासाच्या लेखकांपैकी एकटेरिना हेर्टॉग यांच्या मते, घरातल्या कामांसोबतच रोबोट कार सुद्धा चालवू शकतील.
मॉल मध्येही असेल रोबोट सक्षम
रोबोट मॉलमध्येही काम करायला सक्षम असेल. शॉपिंग मध्ये आपला खूप वेळ जातो अशात रोबोट आपल्याला हवे असलेल्या सगळ्या वस्तू घेऊन येऊ शकतो, शिवाय रोबोट तिथे कर्मचारी म्हणूनही काम करु शकेल. तिथलीही साफ सफाई करु शकेल आणि हे अगदीच शक्य आहे.
पुढच्या १० वर्षात एकंदरीत गणित बदललेलं असेल, अर्थात ते प्रत्येकाला परवडणार नसेल काही जगातले श्रीमंत व्यक्तीच यांना विकत घेऊ शकतील. पण तज्ञांना अशी आशा आहे की लवकरात लवकर हे रोबोट सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या खिशाला परवडतील असे बनवता येतील. असे झाले तर खूप बरं होईल, आणि अनेक महिलांचा प्रश्न सुटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.