गुगलचा नवा नियम आजपासून लागू; सर्वच वापरकर्त्यांसाठी असेल अनिवार्य

google
googlegoogle
Updated on

Google 2 step Verification : सर्च इंजिन प्लॅटफॉर्म Google ने सर्व वापरकर्त्यांसाठी टू स्टेप व्हेरिफीकेशन अनिवार्य केले आहे. Google चे नवीन टू स्टेप व्हेरिफीकेशन आजपासून म्हणजेच 9 नोव्हेंबर 2021 पासून सर्व वापरकर्त्यांसाठी लागू केले गेले आहे. हा नवीन नियम सर्व Google वापरकर्त्यांसाठी असेल अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना Google च्या नवीन 2 step Verification प्रोसेसबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा, 9 नोव्हेंबरनंतर तुम्हाला Google खाते वापरताना अडचणी येऊ शकतात.

वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा मिळणार

Google ची 2 step Verification प्रक्रिया अतिरिक्त सुरक्षा सेक्युरिटी लेयर देईल ज्यामुळे तुमचे Google खाते अधिक सुरक्षित होईल या वर्षी मे महिन्यात गुगलने 2 step Verification ची घोषणा केली होती. जे गुगलने ९ नोव्हेंबरपासून अनिवार्य केले आहे. सध्या ऑनलाईन पासवर्ड चोरीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी कंपनीकडून 2 step Verification प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरनंतर Google खात्यात लॉग इन केल्यानंतर वापरकर्त्यांना एसएमएस किंवा ई-मेलवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठविला जाईल, जो एंटर केल्यानंतरच Google खाते वापरता येईल. Google खात्यांसाठी 2 step Verification अपडेट 9 नोव्हेंबरपासून ऑटोमॅटीक सक्रिय केले जाईल. म्हणजे यासाठी यूजर्सला काहीही करावे लागणार नाही.

google
Lava ने लॉंच केला देशातील पहिला स्वदेशी 5G स्मार्टफोन

2 step Verification कसे सुरु करावे

  • सर्व प्रथम तुमचे Google खाते उघडा.

  • यानंतर नेव्हिगेशन पॅनलवर दिलेला सुरक्षा पर्याय निवडा.

  • “Signing in to Google,” या खाली खाली 2-Step Verification पर्याय असेल तो सलेक्ट करा.

  • यानंतर, ऑन-स्क्रीन स्टेप्स फॉलो करा

google
अँड्रॉइड फोनमध्ये फास्ट चार्जिंग होत नाहीये? फॉलो करा या टिप्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.