Google Phone अॅपमध्ये लवकरच एक नवीन फीचर आणले जात आहे. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ता बनावट आणि अनोळख्या नंबरवरुन आलेले कॉल टाळू शकतील. Google Phone अॅपचे नवीन फीचर Google Pixelआणि Android स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी उपलब्ध असेल. Google Phone अॅपमध्ये नवीन फीचर्स दिल्याने त्याची थेट स्पर्धा Truecaller या अॅपशी होईल. 9to5Google च्या अहवालानुसार, Google डायलर अॅपवर इनकमिंग कॉलसाठी कॉलर आयडी जोडण्याचे काम करीत आहे. गुगलचे हे अॅप फीचरची मागील बर्याच काळापासून चाचणी घेण्यात येत आहे. (google add new feature in google phone app to compete with truecaller)
गुगलच्या नवीन फीचरमुळे काय फायदा होईल
फोनवरील गूगल फोन अॅपमध्ये गूगलचे नवीन फीचर डीफॉल्ट म्हणून सेट केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांचा नंबर सेव्ह नसताना देखील त्यांना कोण कॉल करीत आहे हे ते पहाता येईल हे फीचर बऱ्यापैकी Truecaller आयडी फीचरसारखे काम करेल. म्हणजे वापरकर्ते फोन उचलण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला काय बोलायचे ते ठरवू शकतील. अहवालानुसार गुगल फोन अॅपमधील नवीन फीचरच्या रोलआउटनंतर वापरकर्त्यांना अनेक नवीन सुविधा मिळतील.
Google अॅपचे नवीन फीचर कसे काम करेल
गुगल अॅपची नवीन फीचर एनेबल करण्यासाठी वापरकर्त्याला गुगल फोन अॅपवर क्लिक करावे लागेल.
यानंतर वापरकर्त्यांना सेटिंग्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर, कॉलर आयडी पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल.
कॉलर आयडी डीफॉल्ट हा पर्याय डिसेबल करावा लागेल.
यानंतर, Always आणि Never या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
(google add new feature in google phone app to compete with truecaller)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.