Google AI : गुगलच्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शोध परिणाम आधारावर माहिती देणाऱ्या 'एआय ओव्हरव्ह्यूज' या फीचरमध्ये चुका आढळून आल्याने गेल्या आठवड्यात गदारोळ झाला होता. आता गुगलने या चुकांसाठी कारणं दिली आहेत आणि त्यांच्या फीचरमध्ये सुधारणा करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
वापरकर्त्यांनी चुकीच्या माहितीचा मोठा पाढा वाचला.त्यावर 'डेटा व्हॉइड्स' आणि चुकीच्या माहितीमुळे चुका झाल्याचे गुगलचे म्हणणे आहे.
शेकडो वापरकर्त्यांनी गूगलच्या 'एआय ओव्हरव्ह्यूज' फीचरमध्ये चुकीची माहिती दाखवल्याची तक्रार केल्यानंतर आता कंपनीने यामागचे कारण स्पष्ट केले आहेत. गुगल म्हणते की, एआय मॉडेलला पुरेसा डेटा (माहितीचा स्रोत) न मिळाल्याने आणि चुकीच्या माहितीमुळे (फेक स्क्रिनशॉट्स) अशा चुका झाल्या.
गुगलच्या या नवीन फीचरने काही विचित्र आणि असंबंधित माहिती दाखविल्याने गेल्या आठवड्यात चांगला गोंधळ झाला होता. सध्या अमेरिकेत उपलब्ध असलेल्या या फीचरमध्ये वापरकर्त्यांच्या शोध प्रश्नांवर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत सारांश दाखवले जाते.
परंतु, या एआयमुळे अनेक चुकीची माहिती समोर आली. या समस्येची त्वरित दखल घेत गुगलने काही चुकीची माहिती दाखवणारे 'एआय ओव्हरव्ह्यूज' हटवले.
गुगल सर्चच्या वरिष्ठ उपाध्यक्ष लिज रीड यांनी या चुकांसाठी डेटा व्हॉइड्स (माहितीचा अभाव) आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले चुकीचे स्क्रीनशॉट हे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की, एआय ओव्हरव्ह्यूज सामान्यपणे चुकीची माहिती देत नाहीत, परंतु कधीकधी इंटरनेटवरवर असलेली चुकीची माहिती चुकीच्या प्रकारे दाखवू शकतात.
या फीचर लाँच करण्याआधी गुगलने त्याची चांगली परीक्षा केली असल्याचेही रीड यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, "या परीक्षेत वेगवेगळ्या शोध प्रश्न तपासणे, तसेच एआय कसे काम करते ते पाहण्यासाठी काही प्रमाणात लोकांच्या शोधांवर ही चाचणी करण्यात आली.
परंतु, लाखो लोकांनी अनेक नवीन शोध केल्यावर काय होते ते आम्हाला माहीत नव्हते. काही वेळा चुकीची माहिती मिळवण्यासाठी केलेले विचित्र शोधही आम्हाला पाहायला मिळाले."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.