Technology Trending : सोशल मीडियाच्या दोन दिग्गज कंपन्या गुगल आणि मेटा यांच्या गुप्त करारामुळे टेक जगतात खळबळ उडाली आहे. या करारानुसार, युट्यूबवर 13 ते 17 वर्षीय किशोरवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांना इंस्टाग्राम जाहिराती दाखवल्या जात होत्या. ही गोष्ट फायनान्शियल टाइम्सने उघड केली असून यामुळे या दोन्ही कंपन्यांवर टीका होण्याची शक्यता आहे.