Google Gemini Row : गुगलच्या दिलगिरीनंतर काय म्हणाले राजीव चंद्रशेखर? 'जेमिनी'मध्ये नेमक्या काय त्रुटी? जाणून घ्या

चॅटबॉट ‘जेमिनी’मधील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अविश्‍वासार्ह तपशील प्रसिद्ध झाल्याबद्दल ‘गुगल’ने माफी मागितली आहे.
google apology for gemini chatbot central govt action science and technology
google apology for gemini chatbot central govt action science and technologySakal
Updated on

न्यूयॉर्क : चॅटबॉट ‘जेमिनी’मधील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अविश्‍वासार्ह तपशील प्रसिद्ध झाल्याबद्दल ‘गुगल’ने माफी मागितली आहे. गोंधळाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती.

तसेच, ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. ‘जेमिनी’ हे गुगलचे चॅटबॉट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर या चॅटबॉटवर अविश्वासार्ह आणि अस्वीकारार्ह तपशील आल्याचे आरोप झाले होते.

त्यामुळे गुगलवर जोरदार टीका होतानाच या चॅटबॉटच्या विश्वासार्हतेवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी ‘जेमिनी’ने दिलेल्या प्रतिसादातील तफावतीसंदर्भातही गुगलला केंद्र सरकारने स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली होती, असे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. त्यामुळेच गुगलने माफी मागितल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी ‘सीईओ’ सुंदर पिचाई यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. यानंतर गुगलने ‘जेमिनी’ चॅटबॉटची मानवी प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता तात्पुरती खंडित केली. पिचाई यांनीही या चुकीबद्दल खंत व्यक्त केली. ही चूक अस्वीकारार्ह असून या परिस्थितीत सुधारणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तरीही गुगलवर जोरदार टीका झाल्यामुळे आज त्यांनी हे माफीचे पाऊल उचलले, असे सांगितले जात आहे.

ग्राहकांना महत्त्व द्यावे

भारतात कार्यरत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या छाननीसाठी सरकारवर दबाव वाढत असतानाच केंद्र सरकारने त्यांच्या परवान्यासंदर्भातही काही नियम प्रस्तावित केले आहेत. या ‘एआय’ प्लॅटफॉर्मना भारतातील आयटी आणि गुन्हेगारी कायद्यासंदर्भातील कायदेपालनाची जाणीव करून देतानाच, त्यांनी भारतीय ग्राहकांना महत्त्व द्यावे, यावरही भर दिला असल्याचे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

‘जेमिनी’तील त्रुटी

  • माहिती प्रसिद्ध होताना वर्णभेदी माहिती

  • ऐतिहासिक माहिती देताना अचूकता नाही

  • व्यक्तींची चित्रे निर्माण करतानाही वंशद्वेषाला पूरक चित्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.