Google Update : आपल्या दैनंदिन वापराच्या गूगलमध्ये आता एक नवेनचं फीचर आलं आहे नोटिफिकेशन टॅब! या टॅबमुळे आता माहिती मिळवणे आणि अपडेट्सवर नजर ठेवणे सोप्पं होणार आहे.
आधीपासूनच गूगलमध्ये डिस्कवर फीड होता, ज्याद्वारे सगळी महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळायची. आता या नवीन नोटिफिकेशन टॅबमुळे हवामान, क्रीडा संघांचे अपडेट्स, स्थानिक बातम्या, फ्लाइट्स आणि अगदी ‘शब्द’ (वर्ड ऑफ द डे) यासारच्या अनेक गोष्टींच्या नोटिफिकेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील.
हे नोटिफिकेशन टॅब सध्या सर्व वापरकर्तेसाठी (यूजर्स) अजून उपलब्ध नाही, पण लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. यात नोटिफिकेशन दोन भागात विभागली आहेत - आज (टुडे) आणि आधी (अर्लियर). त्यामुळे गेल्या 24 तासांपेक्षा जुनी अपडेट्सही तुम्ही पाहू शकता.
या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या विशिष्ट विषयावर (अपडेटवर) आधारित सर्च रिझल्ट पाहायला मिळेल. याशिवाय, प्रत्येक नोटिफिकेशनच्या पुढे तीन डॉट्सचा मेन्यू असणार आहे. या मेन्यूमध्ये तुम्ही नोटिफिकेशन डिलीट करू शकता, त्यासारख्या नोटिफिकेशन बंद करू शकता आणि फीडबॅकही देऊ शकता.
अॅप डिझायनमध्ये झालेला हा मोठा बदल आहे. याआधी गूगल सिस्टममध्ये जेमिनी नावाचा चॅटबॉट आला. त्याचप्रमाणे आता सर्च रिझल्ट लिंक स्वरुपात शेअर करता येतात. या सर्व नवीन फीचर्समुळे गूगल अॅप आणखी स्मार्ट आणि वापरण्यास सोपे बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.