Google Ask Photos : आता फोटो शोधणं झटपट आणि सोप्पं! Google लाँच करतंय 'आस्क फोटोस' फीचर,कसं वापरायचं,पाहा

Google Introduces ask photos natural language photo search : गुगलच्या ‘आस्क फोटोज’ फीचरमुळे फोटो शोधणे आता सोपे झाले आहे.कसे काम करेल जाणून घ्या.
Google Introduces ask photos feature
Google Introduces ask photos featureesakal
Updated on

गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा घेऊन आले आहे ज्यामुळे फोटो शोधणे अधिक सुलभ होणार आहे. ‘आस्क फोटोज’ नावाच्या या नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्ते आता आपली फोटो लायब्ररी सहजपणे शोधू शकतात. या फीचरमध्ये गुगलच्या ‘जेमिनी एआय मॉडेल्स’चा वापर केला जात असून, वापरकर्ते नैसर्गिक भाषेत फोटो आणि व्हिडिओ शोधू शकतात.

‘आस्क फोटोज’ नेमकं काय आहे?

‘आस्क फोटोज’ हे एक प्रगत साधन आहे, ज्यामुळे वापरकर्ते आपल्या फोटो लायब्ररीशी संवाद साधू शकतात. याआधी फक्त ठराविक कीवर्डच्या आधारे फोटो शोधता येत असत, पण आता वापरकर्ते अधिक सखोल आणि वर्णनात्मक प्रश्न विचारून आपले आवडते फोटो शोधू शकतात. उदाहरणार्थ, "माझ्या आणि माझ्या मित्राचा गार्डनमधील फोटो" असा प्रश्न विचारल्यास हे फीचर संबंधित फोटो दाखवेल. तसेच, "लग्नात डांस करतानाचा फोटो" किंवा "संपूर्ण कुटुंबाचा फोटो" असे विशिष्ट प्रसंग शोधण्यासही मदत होईल.

या फीचरमुळे मोठ्या फोटो संग्रहातून आवश्यक फोटो सहज शोधणे शक्य होते. हे गुगलच्या एआय मॉडेल्सच्या मदतीने फोटोंचा संदर्भ, त्यात असलेल्या लोकांचे चेहरे, ठिकाणे आणि घटनांचा शोध घेते. तुम्ही जसे "आम्ही मागच्या वेळी लास्ट ट्रीप कुठे केली होती?" किंवा "मुंबईमधील हॉटेलमध्ये काय खाल्ले होते?" असे प्रश्न विचारू शकता आणि गुगल त्यावर आधारित फोटो शोधून दाखवेल. फोटोमधील लहानसहान तपशील ओळखून, हे फीचर तुम्हाला अगदी अचूक फोटो शोधून देईल.

Google Introduces ask photos feature
Whatsapp Group Call Link : व्हॉट्सॲपमध्ये खास फीचरची एंट्री! ग्रुप कॉल अन् चॅटसाठी ठरणार खूप फायद्याचं,कसं वापरायच पाहा

‘आस्क फोटोज’ लाँच कधी होणार?

‘आस्क फोटोज’ फीचर सध्या अमेरिकेतील काही निवडक वापरकर्त्यांसाठी गुगल लॅब्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जात आहे. गुगलने या फीचरच्या अचूकतेवर विशेष भर दिला असून, ते सर्वांसाठी उपलब्ध होण्याआधी या फीचरच्या कार्यक्षमतेची पूर्ण चाचणी केली जात आहे. इच्छुक वापरकर्ते या फीचरचा आधी अनुभव घेण्यासाठी वेटलिस्टमध्ये नाव नोंदवू शकतात.

Google Introduces ask photos feature
Masked Aadhaar Card : हॉटेल किंवा OYO बुकिंग करताय? मास्क आधारकार्ड काय आहे खूपच फायद्याचं,कसं डाउनलोड कराल,पाहा

गुगलने डेटा गोपनीयतेबाबत वापरकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांच्या फोटोंचा किंवा वैयक्तिक माहितीचा वापर जाहिरातीसाठी केला जाणार नाही. काही विशिष्ट परिस्थितीत किंवा अपवापरास टाळण्यासाठी काही प्रश्नांचे मानवी तपासणीसाठी पुनरावलोकन होऊ शकते, परंतु यावेळी तुमच्या गुगल खात्याशी जोडलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()