गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

play store
play store
Updated on

गुगलने प्ले स्टोअरवरून (Play Sore) 7 धोकादायक ॲप काढून टाकले आहेत. Kasperskey च्या एका मालवेअर विश्लेषक तात्याना शिश्कोवा (Tatyana Shishkova) यांनी या सर्व 7 ॲप्समध्ये असलेल्या मालवेअरचा शोध लावला होता. त्यांनी सांगितले की, हे धोकादायक ॲप् 'ट्रोजन' जोकर सारख्या मालवेअरने संक्रमित केलेले आहेत. अलीकडे स्क्विड गेम वापरकर्त्यांना अशाच प्रकारच्या मालवेअर हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे.

play store
Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

हे धोकादायक ॲप्स फोनमधून ताबडतोब डिलीट करा

Google ने हे ॲप्स आधीच Google Play Store वरून काढून टाकले आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 7 धोकादायक अॅप्स असतील तर ते लगेच काढून टाका. अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तविक, हे धोकादायक ॲप्स आतापर्यंत कोटींच्या संख्येने डाऊनलोड झाले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये असे धोकादायक ॲप्स आहेत की नाही हे तपासले पाहिजे. तसे असल्यास, त्यांना त्वरित फोनवरून काढून टाका.

हे आहेत ते 7 धोकादायक ॲप्स

Now QRcode Scan - 10,000+ इंस्टॉल

EmojiOne Keyboard - 50,000 हून अधिक इंस्टॉल

Battery Charging Animations Battery Wallpaper - 1,000 हून अधिक इंस्टॉल

Dazzling Keyboard - 10 इंस्टॉल

Volume Booster Louder Sound Equalizer - 100 स्थापित

Super Hero-Effect - 5,000 इंस्टॉल

Classic Emoji Keyboard - 5,000 इंस्टॉल

play store
मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

ऑनलाइन सेवांचा वापर करताना…

Google ने बॅन केलेल्या 7 धोकादायक ॲप्समध्ये मालवेअर हल्लाकरुन बनावट सब्सक्रिप्शन आणि इन-ॲप परचेस यासारख्या फसवणूक करणाऱ्या ऑफर दिल्या जातात.अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी या लिंक्स आणि अनावश्यक खरेदीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सध्याच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइनकडे वळत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.