Google Chrome : ‘या’ लॅपटॉप आणि कॉम्पुटरमध्ये गुगल क्रोम होणार बंद

आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असले किंवा नसले, तरी गुगल (Google) कडे ते नक्कीच असते.
google chrome
google chromesakal
Updated on

Google Chrome Support Withdrawn from these Devices : आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असले किंवा नसले, तरी गुगल (Google) कडे ते नक्कीच असते. आपण गुगल सर्च इंजिन आपल्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटपासून लॅपटॉप आणि सर्व कॉम्पुटर डिव्हाइसवर वापरतो. गुगल सारखे असे अनेक सर्च इंजिन आहेत जे वापरले जाऊ शकतात आणि या यादीमध्ये Google Chrome चा देखील समावेश आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही लॅपटॉप आणि कॉम्पुटरबद्दल सांगणार आहोत ज्यावर एका ठराविक तारखेनंतर गुगल क्रोम (Google Chrome) वापरता येत नाही.

google chrome
Galaxy A04s: सॅमसंग घेऊन येतेय कमी किमतीत आणखी एक जबरदस्त फोन; मिळतील 'हे' फीचर्स

गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउझर अनेक कॉम्प्युटरवर आणि लॅपटॉपवर काम करणे बंद करेल. कंपनीने सपोर्ट फोरममध्ये जाहीर केले आहे की, Google Chrome Windows आता काही लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काम करणार नाही आणि त्यामुळे लोकांना नवीन सिस्टीम विकत घ्यावी लागू शकते.

google chrome
Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर गुगल क्रोम बंद?

अहवालानुसार, 10 जानेवारी 2023 पासून Microsoft Windows 7 ESU आणि Windows 8.1 (Windows 8.1) वरील Google Chrome चा सपोर्ट काढून टाकला जाईल. गुगल (Google) ने सांगितले आहे की, या डिव्हाइसेसवर क्रोम (Chrome) चे जुने वर्जन काम करेल परंतु नवीन क्रोम (Chrome) या डिव्हाइसेसवर येणार नाही. तुम्हाला नियमित अपडेट्स आणि नवीन वर्जन हवे असतील, तर तुम्हाला Windows 10 आणि Windows 11 वर काम करणारी डिव्हाइसेस वापरावी लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()