नागपूर : मृत्यू हा अटळ आहे. यापासून कोणीही वाचलेला नाही. आज ना उद्या प्रत्येकाला मरायचेच आहे. यामुळे चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. मात्र, मृत्यूनंतर तुमच्या गूगल आणि ॲपल क्लाउड सेवेवर सेव्ह केलेल्या डेटाचे काय होते? याचा कधी विचार केला का? चला तर जाणून घेऊया या विषयी...
आजच्या घडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. ही काळाची गरजही झालेली आहे. यामुळे जीमेल, सर्च, गूगल फोटो यासारख्या अनेक सेवांचा वापर चांगलाच वाढलेला आहे. हे ॲप वापरत असताना गुगलकडे आपल्याबद्दलचा भरपूर डेटा जमा होतो. जेव्हा कोणी अनेक महिने गूगल खाते वापरले नाही तर ते निष्क्रिय केले जाते. आता गूगलने वापरकर्त्यांसाठी नवीन पर्याय आणलेला आहे. याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुमचे खाते कधी निष्क्रिय केले पाहिजे. तसेच डेटाचे काय केले पाहिजे. चला तर जाणून घेऊया या विषयी...
गूगल आता वापरकर्त्यांना त्यांचे खाते आणि डेटा विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करण्याचा पर्याय देत आहे. तसेच खाते निष्क्रिय झाल्यावर गूगलला डिलीट करण्यास सांगू शकता. गूगल वापरकर्त्यास खाते निष्क्रिय करण्यासाठी १८ महिन्यांची प्रतीक्षा कालावधी सेट करण्याची परवानगी देतो. हे सुरू करण्यासाठी वापरकर्ताला myaccount.google.com/inactive वर भेट द्यावी लागले.
या लिंकवर एकदा भेट दिल्यावर आधी निष्क्रियता, ईमेल आयडी, फोन नंबर आणि इतर तपशिलांसाठी प्रतीक्षा कालावधी भरावा लागेल. त्यानंतर गूगल दहा लोकांना निवडण्याचा पर्याय देईल. याद्वारे तुम्ही त्यांना सांगू शकाल की, तुमचे खाते निष्क्रिय झाले असून, त्याचा वापर करीत नाही आहे. वापरकर्ते काही डेटामध्ये प्रवेश आणि डाउनलोड करण्याचा पर्याय देखील देऊ शकतो. असे करायचे नसल्यास ईमेल आयडी जोडण्याची गरज नाही. असे केल्याने तुमचा डेटा हटवला जाईल आणि खाते निष्क्रिय झाल्यावर कोणीही ते वापरू शकणार नाही. या यादीमध्ये Google Pay, Google Photos, Google Chat, लोकेशन हिस्ट्री आदींचा समावेश आहे. तुम्ही ज्याला खाते वापरण्याची परवानगी दिली आहे तो फक्त तीन महिने गूगलचे खाते निष्क्रिय झाल्यानंतर वापरू शकेल.
पाठवला जाईल ईमेल
गूगल सर्वकाही भरल्यानंतर विश्वासार्ह संपर्कास ईमेल पाठवेल. या ईमेलमध्ये एक फुटेर जोडले जाईल. याद्वारे तुम्ही तुमचे खाते वापरणे बंद केल्यानंतर तुम्ही कंपनीला तुमच्या वतीने ईमेल पाठवण्याची सूचना केली होती, हे सांगितले जाईल. तुम्ही निष्क्रिय केल्यानंतर सर्व डेटा हटवायचा निवडल्यास गूगल तुमच्या मालकीचे सर्व काही हटवेल. यामध्ये यू-ट्यूब व्हिडिओ, लोकल हिस्ट्री, गूगल पे डेटा आदींचा समावेश राहील. तुम्ही विश्वसनीय संपर्काची निवड केली तर ईमेलमध्ये त्याची यादी राहील, ज्याची निवड तुम्ही शेअर करण्यासाठी केलेली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.