पाणीपुरी हा आपल्यापैकी कित्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय. केवळ महिलांची लाडकी म्हणून ओळखली जाणारी पाणीपुरी ही खरंतर सगळ्यांनाच आवडते. गोलगप्पे, गुपचुप, पुचका अशा विविध नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या पाणीपुरीची भुरळ चक्क गुगललाही पडली आहे.
गुगलने आज पाणीपुरीचं एक खास डूडल तयार केलं आहे. याला कारण ठरलंय मध्य प्रदेशातील एक हॉटेल. २०१५ साली या हॉटेलने ५१ प्रकारच्या फ्लेवर्सची पाणीपुरी तयार करून गिनिज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. यासोबतच, सगळ्यात जास्त पाणीपुरी विकण्याचा रेकॉर्डही या हॉटेलने आजच्याच दिवशी केला होता. त्यामुळे गुगलने आजचा दिवस पाणीपुरीच्या डूडलसाठी निवडला आहे.
तयार केली गेम
पाणीपुरीच्या चाहत्यांसाठी गुगलने डूडलच्या माध्यमातून एक गेमही तयार केली आहे. गुगलच्या होमपेजवर जाताच, तुम्हाला समोरच हे डूडल दिसेल. या डूडलवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या विंडोमध्ये पाणीपुरीची ही गेम ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला टाईम्ड आणि रिलॅक्स्ड असे दोन पर्याय मिळतील. तुम्हाला कशा प्रकारे गेम खेळायची आहे, त्यानुसार तुम्ही यांपैकी एक पर्याय निवडू शकता. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला विविध प्रकारच्या पाणीपुरी दिसतील.
तुम्ही या गेममध्ये पाणीपुरी विक्रेते आहात, आणि गुगल तुम्हाला ज्या फ्लेवरच्या पाणीपुरी मागेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाणीपुरी निवडून तुम्ही हायस्कोअर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.