Google Genesis Tool : आता पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात; गुगलने आणलं बातम्या अन् आर्टिकल लिहिणारं एआय टूल

गुगल जेनेसिस असं या टूलचं नाव आहे.
Google Genesis Tool
Google Genesis TooleSakal
Updated on

AI Tools : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे जगभरात कित्येक क्षेत्रातील लोकांना मदत होत आहे. मात्र, दुसरीकडे कित्येकांच्या नोकऱ्या जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आता याच लाटेमध्ये पत्रकार आणि न्यूज कंटेंट रायटर्सची नोकरी धोक्यात आली आहे.

याला कारण म्हणजे, गुगलने बातम्या आणि आर्टिकल लिहू शकणारं एक नवीन एआय टूल समोर आणलं आहे. गुगल जेनेसिस असं या टूलचं नाव आहे. सध्या याची चाचणी सुरू असून, लवकरच ते मोठ्या वृत्तसंस्थांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार गुगल करत आहे. (Google Genesis Tool)

Google Genesis Tool
Google Meet : व्हिडिओ मीटिंगमध्ये घरातील पसारा दिसतो? गुगलचं एआय फीचर बदलेल तुमचं बॅकग्राऊंड; असा करा वापर

पत्रकारांना करणार मदत

हे टूल पत्रकारांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं गुगलने म्हटलं आहे. एखाद्या पत्रकाराकडे हातात एक बातमी असताना, त्याला दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी वेळ देता येत नाही. अशा वेळी गुगलचं हे टूल त्या पत्रकाराला काही सेकंदांमध्येच बातमी किंवा लेख लिहून देईल.

सुरुवातीला हे टूल न्यूयॉर्क टाईम्स, दि वॉशिंग्टन पोस्ट, दि वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूज कॉर्प आणि अन्य काही वृत्तसंस्थांना दिलं जाईल. त्यानंतर हळू-हळू ते इतरांसाठी उपलब्ध केलं जाईल असं गुगलने स्पष्ट केलं आहे.

Google Genesis Tool
Google Bard : गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध; मिळाले नवीन फीचर्स

फायदे आणि नुकसान

गुगलच्या या टूलचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. हे टूल एका दुधारी तलवारीपणे असेल, असं क्रेग न्यूमार्क ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नालिझमचे डिरेक्टर जार्व्हिस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी आपला वेळ वाचवण्यासाठी याचा नक्कीच वापर करावा. मात्र, संवेदनशील घटनांमध्ये किंवा सांस्कृतिक, राजकीय घटनांसंदर्भातील बातम्या लिहिताना पत्रकारांनी एआयचा वापर टाळावा, असं ते म्हणाले.

Google Genesis Tool
AI for India 2.0 : आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण; मोदी सरकारने लाँच केली मोठी मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.