व्हॉट्सॲपचे 'हे' भन्नाट फीचर गुगल देतंय Gmail मध्ये, वाचा डिटेल्स

google get these WhatsApp feature will soon be available in Gmail
google get these WhatsApp feature will soon be available in Gmail
Updated on

गुगल Google Chat मध्ये Spaces साठी लवकरच काही नवीन फीचर घेऊन येत आहे. हे भन्नाट फीचर वापरताना तुम्हाला WhatsApp ची आठवण होईल. दरम्यान या फीचर्समध्ये स्पेस मॅनेजर, स्पेस गाइडलाइन्स आणि स्पेस डिस्क्रिप्शन यांचा समावेश असणार आहे आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे घोषणा करताना, Google ने सांगितले की, हे फीचर्स वापरकर्त्यांना लोक (people), विषय (Topics) आणि त्यांचे प्रकल्प (Project) व्यवस्थित हताळण्यात आणखी मदत करतील.

दरम्यान स्पेस मॅनेजरमुळे काही वापरकर्त्यांना स्पेस मॅनेज वर अधिक कंट्रोल मिळणार आहे. यामध्ये ते या स्पेसच्या डिटेल्स आणि स्पेसचे नियम तसेच ग्रुपच्या सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या इतर गोष्टी काय असतील ते देखील ठरवू शकतील.

google get these WhatsApp feature will soon be available in Gmail
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

ब्लॉग पोस्टमध्ये, Google ने म्हटले आहे, WhatsApp ग्रुप प्रमाणेच स्पेस निर्माते बाय डीफॉल्ट स्पेस मॅनेजर असतील. परंतु त्यांना हवे असल्यास ते स्पेसच्या इतर सदस्यांना ही भूमिका सोपवू शकतात. Google स्पेसमध्ये आता वापरकर्त्यांना तुमच्या स्पेससाठी डिटेल्स देखील देता येणार आहेत

वापरकर्ते स्पेस तयार करताना किंवा अधिच असलेल्या स्पेससाठी "View Space Details" ऑप्शन निवडून स्पेसचे वर्णन करु शकतात, स्पेस कशासाठी तयार करण्यात आला आहे, त्याचा उद्देश काय इत्यादी. हे स्पेस डिटेल्स वेब आणि मोबाइल या दोन्हीवर एडीट करता येणार आहेत. तसेच स्पेसचे वर्णन (Space Details) पाहण्यासाठी, वापरकर्ते "View Space Details" हा ऑप्शन निवडू शकतात किंवा जेव्हा वापरकर्ता "Browse Spaces" पाहत असेल तेव्हा देखील ते पाहिले जाऊ शकते.

google get these WhatsApp feature will soon be available in Gmail
Apple चा रशियाला मोठा झटका, अनेक उत्पादनांची विक्री केली बंद

कधी रोलआऊट होणार?

हे नवीन फीचर 28 फेब्रुवारीपासून वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. स्पेस मॅनेजर हे फीचर 14 मार्च 2022 पर्यंत रोलआउट होण्याची अपेक्षा आहे. तर स्पेस डिटेल्स आणि स्पेस गाइडलाईन्स हे फीचर या महिन्याच्या अखेरीस रोलआउट होण्याची अपेक्षा आहे.

google get these WhatsApp feature will soon be available in Gmail
Nokia चे दोन पावरफुल लॅपटॉप, मिळेल दमदार प्रोसेसर अन् बरंच काही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.