गुगलचे 'Gmail Go' लाइट ऍप सर्व ऍंड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध; जाणून घ्या सविस्तर 

google go
google go
Updated on

नवी दिल्ली: गुगलने प्ले स्टोअरवर  Gmail Go हे नवीन ऍप उपलब्ध करून दिलं आहे. गुगलचे हे लाइट ऍप सर्व अँड्रॉइड युजर्स डाऊनलोड करू शकतात. हे जीमेल ऍपचं लाइट वर्जन आहे आणि लो-एंड स्पेसिफिकेशन्स आणि अँड्रॉइड गो प्रकारात येणाऱ्या स्मार्टफोनसाठी खास डिझाईन केलेलं आहे. गुगलने नवीन जीमेल गो ऍप डाउनलोड आणि युजर्सची रेंज चांगलीच वाढवली आहे.

GizmoChina एका अहवालानुसार, जीमेल गो ऍप आता सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. तसेच हे ऍप कोणत्याही अडचणींशिवाय ग्राहक वापरू शकणार आहेत. 

लाइट जीमेल गो ऍपमधील सर्व फिचर मुख्य जीमेल ऍपसारखेच आहेत आणि युजर्सना तसाच अनुभव मिळणार आहे. पण त्यात काही  हेवी विजुअल एलीमेंट्स नाहीत जे मूळ जीमेल ऍपमध्ये उपलब्ध आहेत. नवीन लाईट जीमेल ऍपमध्ये स्क्रीनच्या तळाशी Meet बटण नाही, म्हणजेच गूगल मीट इंटिग्रेशनची नसणार आहे.

जर Gmail Go ऍपचा एकूण लूक पाहिला तर तो पहिल्या जीमेल ऍपपेक्षा अधिक स्पष्ट आणि स्वच्छ दिसत आहे. जर तुम्ही युजर्स मुख्य जीमेल ऍप वापरत असतील तर तुम्हाला नवीन जीमेल गो ऍप थोडे विचित्र वाटू शकते. पण कमी रॅम डोळ्यासमोर ठेवून लाइट ऍपची रचना करण्यात आली आहे.

जीमेल गो ऍपमध्ये एक स्मार्ट इनबॉक्स आहे जो तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रांकडून येणाऱ्या ईमेल्सवर लक्ष देण्यास मदत करेल. सोशल आणि प्रमोशनल ईमेल्सचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करता येते. अनावश्यक संदेश जीमेल गो इनबॉक्समध्ये येण्यापूर्वी स्पॅम ब्लॉक करतो. हे ऍप जीमेल गो ऍपसह मल्टिपल अकाउंट सपोर्ट आणि 15GB मोफत स्टोरेज देखील देते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.