Google Closed Hangout Service : गुगलने अखेर त्यांची व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सेवा गुगल हँगआउट बंद केली आहे. Google ने ही मेसेजिंग सेवा 2013 मध्ये एक स्वतंत्र अॅप म्हणून लाँच केली होती, परंतु येथून पुढे ही सेवाAndroid आणि iOS वर स्वतंत्र अॅप म्हणून उपलब्ध होणार नाहीये. एवढेच नव्हे तर, अधिकृत वेबसाइट किंवा Chrome वेबवर हे उपलब्ध होणार नाही.
गुगलची ही सेवा आता केवळ Google Stadia, YouTube Originals, Google+, Google Allo आणि Google Play Music या सारख्या प्रोडक्ट आणि सेवांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
कंपनीने आणली नवी Google चॅट सेवा
गुगल हँगआउट बंद करताना गुगलने प्रत्येक यूजरसाठी Google Chat उपलब्ध असेल असे घोषित केले आहे. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला Google ने औपचारिकपणे Android आणि iOS वर प्रत्येकासाठी Hangouts बंद करण्यास सुरुवात केली. साधारण जुलैपासून यूजरसाठी हे अनुपलब्ध झाले.
कंपनीचा मेसज काय?
कंपनीने ही सेवा बंद करताना यूजर्ससाठी एक मेसेज दिला आहे. यामध्ये कंपनीने Google Chat वर अपग्रेड होण्याची वेळ आली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून ही सेवा बंद झाली असून, आता हे सर्व चॅट गुगल चॅटवर रीडायरेक्ट होतील असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, Google ने Hangouts सेवा जरी बंद केली असली तरी, यूजर्स त्यांचा सर्व डाटा डाउनलोड करू शकणार आहेत. हँगआऊटवरील डाटा ट्रान्सफर करण्यासाठी कंपनीने यूजर्सना 1 जानेवारी 2023 पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील हँगआऊट यूजर असाल तर वेळीच तुमचा महत्त्वाचा डाटा डाऊनलोड करून घ्या.
कसा कराल हँगआऊटवरील डाटा डाऊनलोड
स्टेप 1: सर्वात प्रथम Google Takeout वर जा येथे तुम्ही Hangouts सह वापरत असलेल्या Google अकाउंटने साइन इन करा.
स्टेप 2 : उपलब्ध अॅप्लिकेशन्समध्ये Hangouts ची निवड करा.
स्टेप 3: पुढील स्टेपवर क्लिक करा.
स्टेप 4 : येथे तुम्हाला किती वेळा बॅकअप डाउनलोड करायचा आहे त्याची निवड करा. येथे तुम्ही साधारण एकदा डाउनलोडचा पर्याय निवडू शकता.
स्टेप 5: फाइलचा प्रकार निवडा आणि एक्सपोर्टवर क्लिक करा.
तुम्ही एक्सपोर्ट बटन क्लिक केल्यावर एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये Google Hangouts वरील डाटाचे फाइल्सची बनवत असल्याचे कळेल. टेकआउट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ईमेल येईल. तुम्हाला ईमेल प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला Hangouts वरील सर्व डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ फाइल डाउनलोड करावी लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.