Google Earthquake Alert : भूकंपाचा इशारा देणार गुगल, भारतात फीचर लाँच! अशी करा सेटिंग

Android Earthquake Alert System असं याचं नाव आहे.
Google Earthquake Alert
Google Earthquake AlerteSakal
Updated on

गुगलने आपली 'अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम' आता भारतात लाँच केली आहे. देशातील अँड्रॉईड मोबाईलवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे एखादा भूकंप येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांना एक धोक्याची सूचना मिळणार आहे.

गुगलने ही सेवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नॅशनल सेस्मोलॉजी सेंटर यांच्यासोबत मिळून भारतात उपलब्ध केली आहे. 'Android Earthquake Alert System' असं याचं नाव आहे. काही दिवसांमध्ये टप्प्या-टप्प्याने देशातील सर्व अँड्रॉईड मोबाईलमध्ये हे फीचर मिळेल.

कसं करेल काम?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये एक एक्सेलेरोमीटर असतो. हा सेन्सर वेळप्रसंगी मिनी सेस्मोमीटर (भूकंप मापक) म्हणूनही काम करतो. एकाच वेळी एकाच भागातील काही अँड्रॉईड मोबाईल्स आणि इतर डिव्हाईसेसना जर भूकंपाचे हादरे जाणवले, तर गुगलचे सर्व्हर त्या भागातील सर्व अँड्रॉईड मोबाईल्सना भूकंपाचा इशारा पाठवेल.

दोन प्रकारचे अलर्ट

गुगल या माध्यमातून दोन प्रकारचे इशारे देणार आहे. यातील पहिला इशारा 'Be Aware' - म्हणजेच, धोक्याचा इशारा असणार आहे. हलक्या भूकंपाच्या धक्क्यांवेळी हा इशारा देण्यात येईल. तर दुसरा इशारा हा 'Take Action' असा असणार आहे. हा इशारा तुमचा मोबाईल डू नॉट डिस्टर्ब किंवा सायलेंट मोडवर असला तरीही देण्यात येईल. गंभीर परिस्थितीमध्ये हा सिग्नल मिळेल.

अशी करा सेटिंग

अर्थक्वेक अलर्स सुरू करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईड व्हर्जन 5.0 किंवा त्यापुढील व्हर्जन्स असायला हवेत. हे अलर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला फोनची लोकेशन सुविधा सुरू ठेवणं गरजेचं आहे. यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सेफ्टी अँड इमर्जन्सी सेटिंग्स हा पर्याय निवडा. यामधील Earthquake Alerts हे टॉगल सुरू करा. यानंतर तुम्हाला इमर्जन्सी अलर्ट मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.