New App : मुलांची शाळा सुटताच पालकांना मिळणार अलर्ट; गुगलचं नवं अ‍ॅप

गूगलच्या या अ‍ॅपमुळे पालकांना मुलांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे.
Google
GoogleSakal
Updated on

Google New Famili Link App : Google ने त्यांचे Family Link अ‍ॅप नवीन वैशिष्ट्ये आणि नवीन फिचर्ससह सादर केले आहे. फॅमिली लिंकच्या नव्या आवृत्तीमध्ये तीन मोठे वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये हायलाइट, कंट्रोल आणि लोकेशन आदींचा समावेश आहे. (Google Introduces Revamped Family Link App)

Google
Google Photos : अशाप्रकारे बॅकअप घेऊन क्लीन करा फुल झालेले स्टोरेज

नवीन अ‍ॅपमध्ये सूचनांसाठी मध्यवर्ती हबदेखील आहे. Google ने Family Link पहिल्यांदा 2017 मध्ये सादर केली होती. गूगलच्या या अ‍ॅपमुळे पालकांना मुलांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे.

Google
Google Diwali Gift : गूगलकडून यूजर्सला 'दिवाली सरप्राइज'; 'हे' शब्द सर्च करा अन्...
Online mobile game
Online mobile gamesakal

याशिवाय Family Link अ‍ॅप मुलांचा स्क्रीन टाईम आणि अ‍ॅप वापराविषयीदेखील माहिती देते. Family Link च्या मदतीने पालक त्यांच्या मुलांचे फोन किंवा टॅब्लेट लॉक करू शकतात. तसेच अ‍ॅप वापरण्यासाठी वेळदेखील सेट करू शकणार आहे.

फॅमिली लिंक अ‍ॅपच्या नव्या अपडेटमुळे मुलांनी वापरलेल्या अ‍ॅप्सची हिस्ट्रीदेखील समजणार आहे. याशिवाय मुलांनी कोणतेही नवीन अ‍ॅप इन्स्टॉल केल्यास त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. मुलांच्या फोनवर येणाऱ्या सर्व सूचनांची माहिती पालकांना या अ‍ॅपमध्येच मिळणार आहे.

Google
Hashtag : हॅशटॅग वापरून असे वाढवा इन्स्टाग्रामवरचे फॉलोअर्स

फॅमिली लिंकच्या नव्या अपडेटमध्ये सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन टॅब आहे. यामुळे पालकांच्या फॅमिली लिंक अ‍ॅपमध्ये मुलांच्या फोनचे लाईव्ह लोकेशन बॅटरी लेव्हलसह दाखवले जाणार आहे. याशिवाय मुले शाळेमधून बाहेर पडताच पालकांना गुगल मॅपद्वारे त्याचा अलर्ट मिळणार आहे.

अ‍ॅपलच्या नवीन पॅरेंटल कंट्रोल्सनंतर Google ने त्यांची फॅमिली लिंक री-डिझाइन केलेली आवृत्ती सादर केली आहे. Apple ने iOS 16 सह अनेक पॅरेंटिंग फिचर्स सादर केली आहेत. ज्यात स्क्रीन टाइमसाठी क्विक स्टार्ट फिचर समाविष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.