Gemini App India : गुगलने भारतात लाँच केलं Gemini अ‍ॅप; मिळणार ९ भाषांमध्ये बार्डची सुविधा,जाणून घ्या आणखी नवे फीचर्स

Google Bard Language Options : तुमच्या आवडीच्या भाषेत गुगल बार्ड करेल तुमची मदत,नवे फीचर्स तुम्हाला करतील एकदम खुश
Google Gemini App Available in 9 Languages
Google Gemini App Available in 9 Languagesesakal
Updated on

Artificial Intelliegence : आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलेले चॅट बॉट Google Bard आता फक्त वेबसाईट राहिले नाही तर त्याचे अ‍ॅपमध्ये रूपांतर झाले आहे आणि आता तुम्ही हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या ९ भारतीय भाषांमध्ये गुगलच्या जेमिनीशी संवाद साधू शकणार आहात.(Google Bard)

जेमिनी हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आहे. त्याचे मोबाइल अॅप आधी फक्त इंग्रजीमध्ये होता. पण आता तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत त्याच्याशी बोलू शकता, प्रश्न विचारून माहिती मिळवू शकता.(Gemini)

गुगलच्या या निर्णयामुळे भारतातील अनेक लोकांना आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा लाभ घेणे सोपे होणार आहे. ज्यांना इंग्रजी येत नाही अशा लोकांनाही जेमिनीच्या मदतीने आपल्या गरजा पूर्ण करता येणार आहेत.

केवळ इतकेच नाही, तर जेमिनी आता अधिक सक्षम बनला आहे. तुम्ही आता त्याला फक्त प्रश्न विचारू शकत नाही तर डाटा विश्लेषणासाठी फायलीही अपलोड करू शकता. अगदी गाडीचा टायर बदलण्यापासून मैत्रिणीसाठी पत्र लिहिण्यापर्यंत जेमिनी तुमची सर्व मदत करेल.

Google Gemini App Available in 9 Languages
Loki Dinosaur : सुरीसारखी शिंगे, 5 टन वजन; मार्वलमधील 'लोकी'ची आठवण करून देणाऱ्या डायनोसरच्या नव्या प्रजातीचा शोध

गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी या नवीन अपडेटची घोषणा केली. ते म्हणाले, "जेमिनी तुम्हाला टाईप करण्यास, बोलण्यास आणि अगदी एखादे चित्र जोडण्याची सुविधा देते. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता."

तुम्ही जेमिनी अॅप डाउनलोड करू शकता किंवा गुगल असिस्टंटच्या माध्यमातून त्याचा वापर सुरू करू शकता. आयओएस वापरणाऱ्यांसाठीही जेमिनी सुविधा उपलब्ध आहे.

Google Gemini App Available in 9 Languages
Fridge Use Tips : पावसाळ्यात फ्रीज काही तासांसाठी बंद ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या एका क्लिकवर

या नवीन जेमिनीसह आता माहितीच्या विश्वात ज्यांना भाषेची अडचण होती त्यांच्या सर्व अडचणी आता मिटणार आहेत आणि ते चांगल्या प्रकारे या कृत्रिम बुद्धिमतेचा,त्याच्या माहितीचा आणि ज्ञानाचा वापर करू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.