बऱ्याचदा अनोळखी ठिकाणी जात असताना गुगल मॅप्स हे अॅप रस्ता शोधण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. आता गुगल मॅप्स मध्ये आणखी काही भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. लोक बऱ्याच दिवसांपासून गुगल मॅप्समधील या फिचर्सची वाट पाहत होते. या नव्या फिचर्स बद्दल सांगायचे झाले तर, हे तुम्हाला उड्डाणपूलावरून जाताना मदत करणार आहे. अनेक वेळा गुगल मॅपमुळे लोक चुकीचा उड्डाणपूल घेतात, त्यामुळे बराच वेळ आणि इंधन वाया जातं. कारण आत्तापर्यंत गुगल मॅप तुम्हाला कोणता फ्लायओव्हर घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही हे स्पष्टपण सांगत नव्हते.
गुगल मॅपने हे नवीन फीचर भारतात रिलीज केले असून चारचाकी वाहनांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. भारतात एकूण ६ नवीन फीचर्स रिलीझ करण्यात आले आहेत, ज्यामध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फ्लाय ओव्हर अलर्ट, ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती, मेट्रोचे तिकीट, इंसिडेन्ट रिपोर्ट असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. कंपनीने सांगितलं की, या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना अचूक माहिती मिळेल.
या नॅव्हिगेशन सिस्टीमचा फायदा चार चाकी गाडी चालवणाऱ्यांना होईल असे गुगलने म्हटले आहे. भारतात, अनेकदा चारचाकी चालवणाऱ्या लोकांना गुगल मॅप अगदी अरुंद रस्त्यांवर घेऊन जाते. यामुळे अनेकदा गाड्या रस्त्यांवर अडकतात. तसंच उड्डाणपुलांची माहिती न मिळाल्याने अनेकांना पुन्हा फिरून मागे यावे लागते. गुगलने जारी केलेलं हे फिचर सध्या ८ शहरांसाठी जारी करण्यात आले आहे, ज्यात हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, इंदूर, भोपाळ आणि भुवनेश्वर इत्यादी शहरांचा समावेश आहे.
भारतात कार चालवताना गुगल मॅपचा वापर करताना फ्लायओव्हरच्या वेळी अडचणीचा सामना करावा लागतो. अनोळखी रस्त्यावर असताना, उड्डाणपुलावर जाण्याबद्दल किंवा उतरण्याबद्दल माहिती उपलब्ध नसते. अशा स्थितीत आपण रस्ता चुकतो. त्यामुळे गुगल मॅपचे हे फ्लायओव्हर अलर्ट खूप उपयुक्त ठरू शकतात
भारतात इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने वाढत आहे, आता बरेच लोक इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत, Google Maps ईव्ही चार्जिंग स्टेशन फीचर वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हे फीचर वापरून, ईव्ही वापरकर्त्यांना त्यांच्या मार्गावर येणाऱ्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती सहज मिळेल.
Google ने ONDC आणि Namma Yatri सोबत भागीदारी केली आहे. यामुळे भारतीय वापरकर्त्यांना मेट्रो तिकीट खरेदी करता येणार आहे. त्याची सुरुवात कोची आणि चेन्नईपासून होत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स तिकिटे खरेदी करू शकतील आणि गुगल मॅपवरून पैसेही देऊ शकतील. यासाठी कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
गुगलने Incident रिपोर्ट करण्यासाठी एक फीचर दिले आहे. त्याच्या मदतीने, वापरकर्ते बांधकाम किंवा ट्राफिक संबंधी तक्रार करु शकतील. यासाठी एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. तसेच तुम्ही इतरांच्या रिपोर्ट देखील कन्फर्म करू शकता. हे अपडेट सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, ज्यामध्ये Android, iOS, Android Auto आणि Car Play चा देखील समावेश आहे.
बरेच लोक इंटरनेट किंवा गुगल मॅपवर जवळचे हवे ते ठिकाण शोधतात. यामध्ये हॉटेल्स, मार्केट, पर्यटनस्थळ इत्यादी ठिकाणांचा समावेश असतो. अशा ठिकाणांना आपण मार्क करू शकता. तसेच तुम्ही केलेली ही यादी इतर लोकांना देखील दाखवली जाईल. त्याच्या मदतीने तुम्ही नवीन ठिकाणे शोधू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.