Google Maps User Privacy : आजकाल डेटा प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कित्येक कंपन्या आपल्या यूजर्सच्या सायबर सुरक्षेसाठी पावलं उचलत आहेत. टेक जायंट गुगलनेही यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे गुगल मॅप्सची तुमची लोकेशन हॅकर्स काय, तर सरकारही ट्रॅक करू शकणार नाही.
गुगलने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. यासाठी गुगल मॅप्सच्या यूजर-प्रायव्हसीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यानंतर गुगल मॅप्सची लोकेशन हिस्ट्री ही सरकारी एजन्सी किंवा पोलिसांना उपलब्ध होणार नाही.
गुगल मॅप्सच्या लोकेशन हिस्ट्रीला टाईमलाईन म्हटलं जातं. दर नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला गेल्या महिन्याची टाईमलाईन ईमेलवर शेअर केली जाते. यापूर्वी हा डेटा गुगलकडे सेव्ह राहत होता. मात्र, आता डेटा रिटेन्शन पॉलिसीमध्ये बदल करून, केवळ तीन महिन्यांचाच डेटा सेव्ह राहील अशी तरतूद करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासोबतच आतापर्यंत तुमचा गुगल मॅप्सचा डेटा हा थेट क्लाऊडवर सेव्ह होत होता. मात्र, आता यूजर्सना हा डेटा क्लाऊड किंवा डिव्हाईस यांपैकी एका ठिकाणी सेव्ह करण्याची मुभा देखील मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
गुगल मॅप्स आता यूजर्सना एक खास फीचरही देणार आहे. यामुळे लोकेशन हिस्ट्रीमधील एखादं ठराविक ठिकाण यूजर्सना हटवता येणार आहे. म्हणजेच एखादं लोकेशन इनेबल-डिसेबल करण्याची सुविधा गुगल देणार आहे.
यामुळे आपल्या लोकेशन हिस्ट्रीचा संपूर्ण ताबा यूजर्सकडेच राहणार आहे. आपला किती डेटा कुणासोबत शेअर करायचा याबाबत यूजर्स स्वतःच निर्णय घेऊ शकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.