Google Meet : व्हिडिओ मीटिंगमध्ये घरातील पसारा दिसतो? गुगलचं एआय फीचर बदलेल तुमचं बॅकग्राऊंड; असा करा वापर

तुम्ही तुमच्या रुममध्ये बसून अगदी आयफेल टॉवरसमोर बसल्याचा आभास निर्माण करू शकता.
Google Meet new Feature
Google Meet new FeatureeSakal
Updated on

कोरोना नंतर कित्येक कंपन्यांनी आपली वर्क फ्रॉम होम सुविधा तशीच सुरू ठेवली आहे. तसंच, काही कंपन्यांनी हायब्रिड वर्किंग स्वीकारलं आहे. यामुळे व्हिडिओ मीटिंग या न्यू-नॉर्मल झाल्या आहेत.

व्हिडिओ कॉलवर मीटिंग सुरू असताना समोरच्या व्यक्तीला केवळ आपणच नाही, तर आपल्या मागे असलेली आपली रूमही दिसत असते. बऱ्याच वेळा केवळ मीटिंगसाठी आपण रुम आवरून ठेवतो. मात्र, ऐन वेळी मीटिंगचा कॉल आला तर? अशा वेळी तुमचीही त्रेधा उडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Google Meet new Feature
Google Bard : गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध; मिळाले नवीन फीचर्स

गुगलची व्हिडिओ मेसेजिंग सुविधा असलेल्या 'गुगल मीट'ने (Google Meet) यावर एक उत्तम उपाय शोधला आहे. एआयच्या मदतीने आता तुम्हाला गुगल मीटमध्ये तुमचं बॅकग्राऊंड बदलता येणार आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या रुममध्ये बसूनही बागेत, दुसऱ्या ठिकाणी किंवा अगदी आयफेल टॉवरसमोर बसल्याचा आभास निर्माण करू शकता.

असं वापरा फीचर

यासाठी तुम्हाला गुगल मीट उघडावं लागेल. त्यानंतर मीटिंग जॉईन करावी लागेल. यानंतर तुम्हाला अप्लाय व्हिजुअल इफेक्ट असा पर्याय स्क्रीनवर दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर जनरेट अ बॅकग्राऊंड या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रकारचे बॅकग्राऊंड तयार करण्याचे आदेश एआयला देऊ शकाल.

Google Meet new Feature
Microsoft 365 Copilot : आता एक्सेल, वर्ड वापरणं होणार सोपं; मिळणार एआयचा सपोर्ट, मायक्रोसॉफ्टची घोषणा

तुम्ही कमांड बॉक्समध्ये ज्या प्रकारे सूचना द्याल, त्याप्रकारे बॅकग्राऊंड तयार होईल. उदाहरणार्थ, तुम्ही जर जंगल असा कीवर्ड टाकलात, तर तुमच्या बॅकग्राऊंडला जंगल दिसेल. तुम्ही जर गार्डन असा कीवर्ड टाकलात, तर तुमच्या मागे बाग दिसेल.

पर्याय उपलब्ध

विशेष म्हणजे, हे एआय फीचर तुम्हाला अपेक्षित बॅकग्राऊंडचे केवळ एकच नाही तर अधिक पर्याय तयार करेल. तसेच, तयार केलेलं बॅकग्राऊंड आणखी एडिट करण्याचा पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध असेल.

वर्कस्पेस लॅब

सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. ज्या यूजर्सना हे फीचर ट्राय करायचे आहे, ते गुगलच्या वर्कस्पेस लॅब्स प्रोग्रामला नाव नोंदवू शकतात. सध्या हे फीचर गुगल मीटच्या केवळ डेक्सटॉप व्हर्जनसाठी उपलब्ध आहे.

Google Meet new Feature
WhatsApp New Feature : आता नंबर सेव्ह न करताही करता येईल चॅट; व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फीचर समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.