Google लवकरच घेऊन येतंय 'पिक्सल' स्मार्ट वॉच, जाणून घ्या फीचर्स

google new pixel watch may be launched soon With Wear OS 3.0 os
google new pixel watch may be launched soon With Wear OS 3.0 os
Updated on

Google चे नवीन स्मार्टवॉच Google Pixel Watch लवकरच लॉन्च होणार आहे. लॉंच झाल्यानंतर गुगल पिक्सेल वॉच ही अॅपल वॉचला टक्कर देईल असे मानले जाते. गुगलच्या आगामी पिक्सेल वॉचचे लॉन्चिंग बद्दल टिपस्टर इव्हान ब्लासने खुलासा केला आहे. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये पिक्सेल स्मार्ट वॉचच्या लॉन्चची तारीख उघड करण्यात आलेली नाही.

लवकरच होणार लाँच

पिक्सेल स्मार्ट वॉच या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर Apple चे नवीन स्मार्ट वॉंच 11 जुलै रोजी Apple इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाईल. नवीन Google स्मार्ट वॉच पिक्सेल रोहन या कोड नावाने समोर आले आहे. मात्र रोहन पिक्सेल हे कोडनेम गुगलच्या पहिल्या स्मार्टवॉचशी खूप पूर्वीपासून जोडले गेले आहे.

google new pixel watch may be launched soon With Wear OS 3.0 os
2011-2019 मध्ये भारतातील गरिबीत 12.3 टक्के घट: वर्ल्ड बँक

काय खास असेल?

नवीन Google Pixel Smart Watch Wear OS च्या लेटेस्ट आवृत्ती 3.1 वर काम करेल. Wear OS 3.1 हे व्हर्जन 3.0 मध्ये काही सुधारणांसह सादर करण्यात आले आहे. नवीन गुगल स्मार्ट वॉच वर्तुळाकार डिझाइन आणि हाय-एंड ईसीजी मॉनिटर्ससह काही बेसीक सेन्सर्स जोडण्यात आले आहेत. तर यात काही आरोग्य आणि फिटनेस फीचर्स देखील मिळतील.

रिपोर्ट्सनुसार ही स्मार्टवॉच 32GB इंटरनल स्टोरेजसह ऑफर केले जाऊ शकते. या डिव्हाईसमध्ये हाय-एंड प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच, स्मार्ट व़चच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

google new pixel watch may be launched soon With Wear OS 3.0 os
"सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात 40 लाख भारतीयांचा मृत्यू"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.