Google pauses image generation in Gemini AI : गुगलने काही दिवसांपूर्वी बऱ्याच थाटा-माटात आपलं जेमिनी हे एआय टूल लाँच केलं होतं. यामधील टेक्स्ट-टू-इमेज या जनरेटिव्ह एआय फीचरची भरपूर चर्चा सुरू होती. मात्र सध्या गुगलचं हे फीचर मोठ्या वादात सापडलंय. यामुळे गुगलने ही सुविधा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अखेर कशामुळे हा निर्णय घेण्यात आलाय, आणि जेमिनी कशामुळे वादात आहे? जाणून घेऊया..
हे सगळं सुरू झालं ते जेमिनीने जनरेट केलेल्या एका वादग्रस्त फोटोमुळे. डायव्हर्सिटीच्या नावाखाली गुगलच्या एआयने एका महिलेचा सेमी-न्यूड फोटो तयार केला होता. यानंतर गुगलचं हे एआय 'रेसिस्ट' असल्याचा आरोप जगभरातून करण्यात आला होता. अगदी 'एक्स'चे मालक इलॉन मस्कनेही याबाबत गुगलवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.
यानंतर गुगलने तातडीने ही इमेज हटवली होती. तसंच याबाबत चौकशी सुरू असून, एआय टूलमध्ये आवश्यक ते बदल लवकरच करण्यात येतील असंही गुगलने स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे, केवळ गुगल जेमिनीच नाही, तर गुगल सर्चमध्ये आणि एकूणच गुगल कंपनीतच प्रॉब्लेम असल्याचं मत इलॉन मस्कने व्यक्त केलंय.
इलॉन मस्कने सांगितलं, "मी गुगलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी याबाबत चर्चा केली आहे. जेमिनीमधील रेशिअल आणि जेंडर बायस समस्येवर गुगल तातडीने उपाय शोधत असल्याचं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे." यासोबतच इलॉनने गुगलला ट्रोल करणारं एक मीमही शेअर केलं होतं.
दरम्यान, जेमिनी एआयने पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह माहिती दिल्यामुळे भारतातील यूजर्सही नाराज आहेत. 'पंतप्रधान मोदी फॅसिस्ट आहेत का?' या प्रश्नावर उत्तर देताना जेमिनीने 'त्यांच्यावर असे आरोप आहेत' म्हटलं होतं. मात्र, हाच प्रश्न ट्रम्प किंवा झेलेन्स्की यांच्याबाबत विचारला असता, जेमिनीने कोणतंही उत्तर दिलं नाही.
गुगल जेमिनीच्या या सगळ्या गोंधळामध्ये इतर एआय कंपन्यांना चांगलीच संधी मिळाली आहे. ओपनएआयचं 'चॅटजीपीटी', मायक्रोसॉफ्टचं 'कोपायलेट' आणि इलॉन मस्कचं 'ग्रॉक' या सर्वांना या गोंधळाचा फायदा होऊ शकतो. मस्कने तर दोन दिवस आधीपासूनच 'ग्रॉक' कसं मह्त्त्वाचं आणि क्रेडिबल आहे याबाबत पोस्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.