गुगल 5 हजार जणांना देणार नुकसान भरपाई

google fine 4 million dollar to 5500 employee
google fine 4 million dollar to 5500 employee
Updated on

सॅन रॅमन (अमेरिका) - कंपनीकडून महिला अभियंता आणि आशियाई लोकांना अवमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी आरोप करणारे कर्मचारी आणि नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अशा एकूण साडे पाच हजार जणांना गुगल कंपनी जवळपास २६ लाख अमेरिकी डॉलर नुकसानभरपाई देणार आहे. भेदभावाच्या या घटना कंपनीच्या कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन राज्यांमधील कार्यालयांमध्ये झाल्या होत्या.

‘गुगल’सारख्या मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या पद्धतीचा कामगार मंत्रालय ठराविक कालावधीने आढावा घेत असते. यावेळी मंत्रालयाने केलेल्या चौकशीत आढळून आले की, २०१४ ते २०१७ या काळात गुगल कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या समकक्ष पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन दिले आहे. गुगलने या आरोपाचा इन्कार केला. मात्र, चार वर्षांच्या लढाईनंतर या कंपनीने काही चूक केल्याचे अमान्य करतानाच नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. ‘प्रत्येकाला, ते कोण आहेत यापेक्षा त्याच्या कामाच्या दर्जाप्रमाणे वेतन दिले जावे, असे आमचे मत आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘गुगल’ने दिली आहे. गेल्या काही वर्षांत आपण महिला आणि पुरुषांमधील भेदभावाबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी अंतर्गत चौकशीही करत असल्याचे ‘गुगल’ने स्पष्ट केले आहे.

‘गुगल’ला द्याव्या लागणाऱ्या २६ लाख डॉलरपैकी १३ लाख ५० हजार डॉलर सुमारे अडीच हजार महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे. उर्वरित १२ लाख ३० हजार डॉलर १७०० हून अधिक महिला आणि आशियाई वंशाच्या उमेदवारांना दिले जाणार आहेत. या सर्वांनी नोकरीसाठी गुगलकडे अर्ज केला होता, मात्र तो अमान्य झाला होता. याशिवाय, भविष्यात अशा प्रकारचा भेदभाव झाल्यास नुकसान भरपाईची खात्री म्हणून ‘गुगल’ने पुढील पाच वर्षे दरवर्षी अडीच लाख डॉलर निधी उभारायचा आहे.

भविष्यातील धोका
१३० अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल असलेल्या ‘गुगल’ किंवा तिची पालक कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’साठी ही नुकसान भरपाईची रक्कम काहीच नाही. मात्र, नुकसान भरपाई द्यावी लागली, हा शब्द तंत्रज्ञान क्षेत्रात पसरल्याने गुगलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांत गुगलच्याच कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनावर टीका केली आहे. वरीष्ठ असलेले पुरुष अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना अवमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप झाला आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत केलेले संशोधन कंपनीच्या धोरणाशी सुसंगत नसल्यावरून एका महिला संशोधकाला नोकरी सोडावी लागल्यानंतर हजारो कर्मचाऱ्यांनी निदर्शने केल्याची घटना नुकतीच घडली होती. या कंपनीत कर्मचारी संघटनाही आकार घेत असल्याचे वृत्त आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.